बांद्यातील विद्यार्थ्यांचे वेशभूषेत यश

बांद्यातील विद्यार्थ्यांचे वेशभूषेत यश

०६९७६
गोवा ः डिचोली येथील स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.

बांद्यातील विद्यार्थ्यांचे वेशभूषेत यश
बांदा ः शिवराज्याभिषेक दिन सोहळा २०२३ निमित्ताने हिंदू संघटना डिचोली-गोवा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या आंतरराज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत बांदा केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. लहान गटात सर्वज्ञ वराडकर (चौथी) याने प्रथम क्रमांक मिळविला तर मोठ्या गटात नैतिक मोरजकर (सहावी) याने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत विविध राज्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून सर्वज्ञ व नैतिक यांनी यश मिळविले. वेशभूषा स्पर्धेसाठी ऐतिहासिक विषय होता. सर्वज्ञ याने छत्रपती संभाजी महाराज यांची तर नैतिक याने बाजीप्रभू देशपांडे यांची वेशभूषा साकारली होती. त्यांच्या यशाने दोघांचेही अभिनंदन होत आहे.
---
आंबेगाव ग्रामपंचायतीतर्फे विकास निविदा
कणकवली ः आंबेगाव (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायतीतर्फे गावातील विकास योजनेसाठी अंदाजपत्रक मागविण्यात आले आहे. मान्यताप्राप्त मक्तेदारांना ग्रामपंचायतीमार्फत नमूद केलेल्या कामांसाठी निविदा भरावयाची आहे. निविदा मागणी १३ जून पूर्वी कार्यालयीन वेळ शईलबंद पद्धतीने सादर करावयाची आहे. त्यामध्ये आंबेगाव शाळा नंबर एक शौचालय दुरुस्त करणे एक लाख २५ हजार १२६ रुपये निधीची तरतूद आहे. आंबेगाव मुख्य रस्ता ते क्षेत्रफळ मंदिर रस्ता खडीकरण, डांबरीकरणासाठी चार लाख ९९ हजार ८८७ रुपये निधी मंजूर केला आहे. निविदा धारकांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com