आरेतील आगीत सुरुच्या झाडांचे नुकसान

आरेतील आगीत सुरुच्या झाडांचे नुकसान

फोटो ओळी
- rat४p९.jpg- KOP२३M०६९६९ आरे ः येथील सुरुबनाला लागलेल्या आगीत जळालेले सुरूचे झाड.

आरेतील आगीत सुरुच्या झाडांचे नुकसान
रत्नागिरी, ता. ४ ः तालुक्यातील आरे येथील सुरुबनाला गुरुवारी (ता. १) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग मध्यरात्री १ वाजता आटोक्यात आली. तेथील ग्रामस्थांनी केलेल्या बचावकार्यामुळे तब्बल ५ तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आरे समुद्रकिनारी असलेल्या सुरुबन येथे गुरुवारी रात्री अचानकपणे सुरु बनाला आग लागली. सुरुच्या झाडांजवळ मोठ्या प्रमाणात सुका पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीमुळे आजुबाजूच्या अनेक झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. सुरुबनात आग लागल्याचे लक्षात येताच तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. तसेच याबाबत वनविभागालाही माहिती देण्यात आली. पोलिस पाटील आदेश कदम, ग्रामपंचायत सदस्य आशिष कनगुटकर व त्यांचे सहकारी व ग्रामस्थांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत वनविभागाच्या कर्मचार्‍यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या आगीत पाच ते सहा सुरुची झाडे जळून खाक झाली आहेत. सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच स्थानिक नागरिक याठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांनी धुम्रपान करताना टाकण्यात आलेल्या सिगरेटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com