प्रत्येक बस मध्ये कचरा साठवण्यासाठी पिशवी

प्रत्येक बस मध्ये कचरा साठवण्यासाठी पिशवी

फोटो
- rat४p२८.jpg- KOP२३M०७०२८ दापोली : येथील बस स्थानकात एसटीच्या ७५ व्या वाढदिवसाला उपस्थित मान्यवर.

जागतिक पर्यावरण दिन विशेष ........लोगो

प्रत्येक बसमध्ये कचरा साठवण्यासाठी पिशवी
--
दापोली आगार ः स्वच्छ बस, बसस्थानकासाठी निवेदिताचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता.४ : सर्वसामान्यांची लालपरी (एसटी) सुरू होऊन एक जून रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ एसटी बस आणि स्वच्छ बसस्थानक अभियान सुरू केले आहे. दापोली आगारातील प्रत्येक गाडीमध्ये एका कचरा साठवण्याची पिशवी ठेवण्यात आली आहे. याचा वापर प्रत्येक प्रवाशाने करावा, असे आवाहन केले आहे.
दापोली आगारातर्फे आगार प्रमुख रेश्मा मधाळे, निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे, प्रा.डॉ. अशोक निर्बाण, किशोर फर्निचरचे मालक दिनेश जैन, एसएमएस हॉस्पिटलचे प्रभंजन निकम, प्रतिभा पाटणे, एसटीचे हर्षल नाफडे, संजय तडवी, मुनाफ राजापकर, प्रणव रेळेकर उपस्थित होते. दापोली एसटी आणि बस स्थानक हे महाराष्ट्राला स्वच्छ बस व बसस्थानक अभियानात महाराष्ट्राला रोल मॉडेल ठरेल असे गौरवोद्गार प्रशांत परांजपे यांनी काढले.
निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ एसटी बस आणि स्वच्छ बसस्थानक अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा आरंभ केला. प्रवाशांनी खाऊचा कचरा, पिशव्या किंवा रिकाम्या पाण्याच्या बाटल्या खिडकीतून बाहेर न टाकता किंवा एसटीत कुठेही न टाकता त्या कचरा जमा करण्यासाठी एसटीमध्ये लावण्यात आलेल्या कचराकुंडीत टाकव्यात असे आवाहन करण्यात आले. यासाठी प्रत्येक गाडीत एका पिशवीचे नियोजन करण्यात आले आहे. या पिशवीचा प्रायोगिक तत्त्वावर उपयोग काही गाड्यांमध्ये दापोली एसटी आगार प्रमुख रेश्मा मधाळे आणि निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे यांच्या हस्ते करण्यात आला. बस स्थानकावर जमा होणारा कचरा आणि एसटीत जमा होणारा सर्व प्लास्टिकचा अविघटनशील कचरा हा एकत्रितपणे जमा करून तो पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येणार आहे. प्रा. अशोक निर्बाण, प्रतिभा पाटणे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी एसटी चालक संजय खटावकर आणि दामोदर पिंपळे यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच सफाई कामगारांचाही विशेष सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक सूरज खेडेकर यांनी केले. सांबप्रसाद जुवेकर यांनी राज्य गीत व स्वलिखीत एसटी गीत सादर केले. दीपक साधले यांनी पसायदान सादर केले .
एसटीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सजवलेल्या एसटीला केक कापून अभिवादन करण्यात आल्यानंतर सर्व प्रमुख उपस्थित आणि अधिकारी, कर्मचारी यांनी एसटीचे एका टप्प्याचे तिकीट काढून दापोली ते दापोली ते बुरोंडी नाका असा प्रवास केला.

कोट
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ सुंदर बस आणि बस स्थानक हा संकल्प निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी दापोली एसटी आगार व एसटी बस स्थानकातील सर्व कर्मचारी, अधिकारी कटिबद्ध आहेत. त्याचप्रमाणे सर्व प्रवाशांनीही सहकार्य करावे.
- रेश्मा मधाळे, आगार प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com