खेडसह दापोली मतदारसंघ विकासासाठी 10 कोटी

खेडसह दापोली मतदारसंघ विकासासाठी 10 कोटी

खेडसह दापोली मतदारसंघासाठी १० कोटी
रामदास कदम ; गुहागर तालुक्यावर लक्ष केंद्रित
खेड, ता. ४ : गुहागर मतदार संघातील खेड तालुक्यातील अनेक गावे विकासापासून वंचितच आहेत. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यासह दापोली मतदार संघातील विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्याकडून १० कोटींचा निधी मंजूर करून घेतला असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.
१० कोटींचा निधी मंजूर केल्याचा निर्णय १६ मे रोजी शासनाने काढला. प्रत्यक्ष विकासकामांचा शासन निर्णय ३० मे रोजी काढला असल्याची माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.
माजी आमदार म्हणून ज्या गावांचे २० वर्षे प्रतिनिधीत्व केले त्या जनतेला न्याय का देवू शकत नाही, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देत १० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. भविष्यातही गुहागर मतदार संघातील गावांना विकासापासून वंचित ठेवायचे नाही, असा निर्धार केला असल्याचे शिवसेनानेते रामदास कदम यांनी सांगितले.
मागील तीन महिन्यात गुहागर मतदार संघातील खेड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून जनतेशी संपर्क साधला. यादरम्यान, अनेक गावे विकासापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी ग्रामस्थांना आश्वासीत करत लवकरच विकासकामांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करेन, असे अभिवचन दिले होते. या आश्वासनांची प्रत्यक्षात पूर्तता झाली असून १० कोटी रूपयांच्या निधीतून तीनही तालुक्यातील विकासकामे मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com