दोडामार्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष मिरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग व्यापारी संघाचे 
अध्यक्ष मिरकर यांचे निधन
दोडामार्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष मिरकर यांचे निधन

दोडामार्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष मिरकर यांचे निधन

sakal_logo
By

07085
लवू मिरकर

दोडामार्ग व्यापारी संघाचे
अध्यक्ष मिरकर यांचे निधन
दोडामार्ग,ता.४ ः तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख लवू मिरकर (वय ५०) यांचे रविवारी सायंकाळी अल्पशा आजराने निधन झाले. महिनाभरापूर्वीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे मिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पंधरा वर्षांहून अधिक काळ दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ते नेहमी प्रयत्नशील असत. दोडामार्गच्या सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान होते. शिवसेनेचे दोडामार्ग शहरप्रमुख म्हणूनही त्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीवर पहिल्या टर्ममध्ये आपल्या पत्नी सुषमा मिरकर यांना नगरसेविका म्हणून निवडून आणण्याची किमया त्यांनी केली होती. पिंपळेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे काही काळ त्यांनी अध्यक्ष व सचिवपद भूषविले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतणे, पुतणी असा परिवार आहे.