मालुसरे घराण्याला ‘श्री शिवसन्मान’

मालुसरे घराण्याला ‘श्री शिवसन्मान’

07143
रायगड ः ‘श्री शिव’ सन्मानाने पुरस्कृत तानाजी मालुसरे घराण्याचा सन्मान करताना अशोकसिंह ठाकूर, सुनील पवार, वैभव पवार आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)

मालुसरे घराण्याला ‘श्री शिवसन्मान’

रायगडावरील सोहळा; ‘श्रीशिवराज्याभिषेक’ समितीचा पुढाकार

कुडाळ, ता. ५ ः शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्री शिव’ सन्मानाने श्री नरवीर तानाजी मालुसरे घराण्याचा सन्मान करण्यात आला. किल्ले रायगडक्षेत्री ३५० वा शिवराज्याभिषेक शक प्रारंभ सोहळा शुक्रवारी (ता. २) श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड मार्फत जल्लोषात साजरा करण्यात आला.
दरवर्षी या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांप्रती निष्ठा असणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या एका सरदार घराण्याचा सन्मान समितीतर्फे ‘श्री शिवसन्मान’ पुरस्कार देऊन करण्यात येतो. यंदा ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून यावर्षी कोंढाण्याच्या लढाईत धारातीर्थी पडलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घराण्याचा सन्मान करण्यात आला. मालुसरे घराण्यातील डॉ. शीतल मालुसरे यांना राज्याभिषेक समयी राजसदरेवर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सन्मान समितीतर्फे प्रदान करण्यात आला. समितीचे सदस्य नीलेश सकट यांच्या संकल्पनेतून साकारलेले कट्यार, वाघनख व शिवराई असलेले मानचिन्ह व मानपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. समितीच्यावतीने छत्रपती शिवरायांची प्रतिमाही भेट देण्यात आली. या सन्मानाने डॉ. मालुसरे भावूक झाल्या होत्या. समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव समीर वारेकर, अमोल कानसे, अमोल जाधव, अशोकसिंह ठाकूर यांच्या हस्ते त्यांना यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेधे, बांदल, देशमुख घराण्यातील प्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य राजू देसाई, रंजन गावडे, संजय ढमाळ, आतिष कुशवाहा आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com