महिला प्रतिनिधींसाठी 
प्रशिक्षणे, अभ्यासदौरे

महिला प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणे, अभ्यासदौरे

माहितीचा कोपरा

07146
विनोद दळवी

महिला प्रतिनिधींसाठी
प्रशिक्षणे, अभ्यासदौरे

लीड
ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा शासकीय कामात सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढून त्यांच्या माध्यमातून शासकीय योजना ग्रामीण भागातील तळागाळात पोचविण्यासाठी महिला प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण, मेळावे घेणे तसेच राज्यांतर्गत व राज्याबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी यासाठी आर्थिक तरतूद केली आहे.
- विनोद दळवी
...............
‘क्रांतिज्योती’ धर्तीवर प्रशिक्षण
पंचायत संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने त्यांची क्षमता बांधणी होणे आवश्यक आहे. पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थांमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला लोकप्रतिनिधींना ‘क्रांतिज्योती’ धर्तीवर प्रशिक्षण आयोजित करणे, महिलांसाठी मेळावे घेऊन मार्गदर्शन करणे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात याकरिता ५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे.
................
तज्ज्ञ मार्गदर्शक
ग्रामस्तर, प्रकल्पस्तर आणि जिल्हास्तर अशा तीन स्तरावर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. यासाठी एका लोकप्रतिनिधीसाठी दहा हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून त्यांच्यामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या महिलांना प्रशासकीय कारभाराचे परिपूर्ण ज्ञान अवगत व्हावे, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास व्हावा, शासनाची प्रत्येक योजना तळागाळात पोहोचावी, हा या मागचा प्रमुख उद्धेश आहे.
...............
अभ्यास दौरा
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींचे पंचायतराज, आदर्श गाव, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व बाल विकासाचे उपक्रम आदी विषयांची माहिती घेण्यासाठी अभ्यास सहलीचे राज्यांतर्गत आयोजन केले जाते. महिला लोकप्रतिनिधींना नावीन्यपूर्ण योजनांची माहिती घेण्यासाठी राज्याबाहेरील दौऱ्यांचे आयोजन केले जाते. राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अशा सहलीसाठी प्रतिवर्षी जास्तीत जास्त पाच लाख रुपये निधीची तरतूद केली जाते. शासकीय कामात महिलांचा सहभाग वाढविणे, महिलांचा आत्मविश्वास वाढविणे, शासकीय योजना समजावून देणे व ग्रामीण भागांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून घेण्यास महिलांना प्रवृत्त करणे हा यामागचा उद्देश आहे.
.............
नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे यासाठी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. महिला व बालकल्याण समिती पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण व दौरा आयोजित करणे, असे या योजनेचे नाव आहे. जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींची अभ्यास सहल यातून आयोजित करण्यात येणार आहे. ही अभ्यास सहल जिल्हा व जिल्ह्याबाहेरील तसेच राज्याबाहेरील पंचायतराज, आदर्श गाव, निर्मल ग्राम, महिला बळकटीकरण, महिला व बाल विकासाचे उपक्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम आदी ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. अशाप्रकारे आयोजित करण्यात येणाऱ्या सहलीचे ठिकाण महिला व बालकल्याण समितीच्या मान्यतेने निश्चित करण्यात येणार आहे.
...............
कोट
जिल्हा, राज्यांतर्गत व राज्याबाहेर अभ्यास सहल आयोजित करून जिल्ह्यातील महिला लोकप्रतिनिधींना तेथील ठिकाणांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नावीन्यपूर्ण व अन्य उपक्रमांचा अभ्यास करून त्या धर्तीवर जिल्ह्यात उपक्रम राबवावा, हा अभ्यास सहलीमागचा उद्देश आहे. महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षित करून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या प्रत्येक योजना पोहोचावी, हा प्रशिक्षणे, मेळावे घेण्यामागचा उद्धेश आहे.
- संतोष भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com