राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने  
मळगावात विद्यार्थी गौरव

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मळगावात विद्यार्थी गौरव

07147
मळगाव ः येथे विद्यार्थी सत्कार प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने
मळगावात विद्यार्थी गौरव

सावंतवाडी, ता. ५ ः मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव हायस्कूलच्या दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिलाध्यक्ष अर्चना घारे परब व सिद्धेश तेंडोलकर मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये सुचित्रा धुरी (९७.६०), शिवम जोशी, रिया नाईक, वृषाली कुंभार (९३.४०), सिद्धी गावडे (९०.२०) या प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अर्चना घारे-परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पर्यावरण विभाग पांडुरंग नाटेकर, सिद्धेश तेंडोलकर, दर्शना बाबर-देसाई, तुषार वालावलकर, सिद्धी तेंडोलकर, टिळक सावळ, पत्रकार सुखदेव राऊळ, गुरुनाथ गावकर, दीपक जोशी, नीलेश मांजरेकर, सुदेश राऊळ, महेश गवंडे, हरी आसयेकर, शशिकांत राऊळ, दीपक जोशी आदींसह मळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर निवडताना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना मानचिन्ह, कॉलेज बॅग, छत्री, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com