श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

sakal_logo
By

rat2p25.jpg
3M06609
रत्नागिरी : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुक्रवारी मारुती मंदिर, शिवतीर्थ येथे छत्रपतींच्या मूर्तीची पूजा करताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी पहिल्या छायाचित्रात, तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित श्री. कुलकर्णी यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी.
----------
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे
शिवराज्याभिषेक दिन साजरा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : शहरातील मारुती मंदिर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. मोठ्या उत्साहात छत्रपतींच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रमुख म्हणून उपस्थित राहिले.
३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा सर्वांना देण्यात आल्या. पाच पातशाह्यावरची मुघलशाही यांच्या छाताडावर पाय देऊन श्री शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले. हिंदवी स्वराज्याचे तख्त श्रीमान रायगडावर संस्थापना करून छत्रपति झाले तो दिवस म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. यानिमित्त छत्रपतींच्या मूर्तीस दुग्ध अभिषेक करून साखर, पेढे वाटून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आनंदात साजरा केला जातो.
आजच्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते श्री शिवछत्रपतिंच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ‌शहर पोलिस निरीक्षक विनित चौधरी, वाहतूक शाखेचे दत्ता शेळके हे देखील उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनाचे मानकरी रुपेश पांचाळ व जान्हवी पांचाळ या दांपत्याच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सर्व धारकऱ्यांसह सर्व शिवप्रेमींना धनंजय कुलकर्णी व सनातन संस्थेचे संजय जोशी यांनी ३५० वा राज्यभिषेक या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी प्रतिष्ठानचे रत्नागिरी शाखा प्रमुख राकेश नलावडे, समीर सावंत, वैभव पांचाळ, जयदीप साळवी, अमित काटे, निखिल सावंत, अक्षत सावंत, अमित नाईक आदी प्रमुख धारकरी उपस्थित होते.