अॅड. देसाईंचे आज फुकेरीत व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅड. देसाईंचे आज फुकेरीत व्याख्यान
अॅड. देसाईंचे आज फुकेरीत व्याख्यान

अॅड. देसाईंचे आज फुकेरीत व्याख्यान

sakal_logo
By

07150
अॅड. शिवाजी देसाई

अॅड. देसाईंचे आज फुकेरीत व्याख्यान
बांदा ः भारतीय समाजरत्न पुरस्कार विजेते गोव्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते अॅड. शिवाजी देसाई यांचे फुकेरी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ले हनुमंत गडावर भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त उद्या (ता. ६) सकाळी अकराला शिवचरित्रावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान सिंधुदुर्ग विभाग आणि माऊली सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, फुकेरी यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सकाळी ६ ते ७ यादरम्यान गडावर पूजन, १० ते ११ वेशभूषा स्पर्धा, ११ ते दुपारी १२.३० अॅड. शिवाजी देसाई यांचे शिवचरित्रावर व्याख्यान आणि नंतर विविध मान्यवरांचा सत्कार सोहळा असे कार्यक्रम होतील. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
.............
अथर्व गवस याचा दोडामार्गात सत्कार
दोडामार्ग ः माध्यमिक शालांत परीक्षेत दोडामार्ग तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या करुणा सदनचा विद्यार्थी अथर्व गवस याचा राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अथर्व याने ९५ टक्के गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला. याबद्दल त्याचे राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी यांनीही सत्कार केला. यावेळी अथर्वचे आई-वडील, बहीण उपस्थित होते.