पॅसेंजर रेल्वे दादरपर्यंत नेण्यासाठी पाठपुरावा

पॅसेंजर रेल्वे दादरपर्यंत नेण्यासाठी पाठपुरावा

पॅसेंजर रेल्वे दादरपर्यंत
नेण्यासाठी पाठपुरावा
रत्नागिरीः रत्नागिरी ते दादर दरम्यान सुमारे २० वर्षे व्यवस्थितपणे सुरू असलेली पॅसेंजर गाडी दिव्याऐवजी पुन्हा दादरपर्यंत नेण्यासाठी यापुढे आक्रमक पाठपुरावा केला जाईल. मुंबई ते चिपळूण तसेच मुंबई-रत्नागिरी अशा स्वतंत्र गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी दिले. वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनासाठी गेलेल्या एका शिष्टमंडळाशी खासदार राऊत यांनी चर्चा केली. त्यांनी कोकणवासीयांच्या रेल्वेसमस्या व्यवस्थितपणे समजून घेतल्या. या वेळी २० वर्षांपासून सुरू असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी कोरोना काळापासून दिव्यापर्यंत थांबत असल्याचे व त्यासाठी पाठपुरावा सुरू असूनही कोकण रेल्वे तसेच मध्यरेल्वेकडे ही गाडी पूर्ववत दादर येथूनच सुरू करावी, अशी मागणी होत असल्याचे राऊत यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचबरोबर सावंतवाडी-दिवा ही गाडी दिव्याऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा दादरपर्यंत न्यावी, मुंबई चिपळूण तसेच मुंबई रत्नागिरी अशा स्वतंत्र गाड्या सुरू कराव्यात, अशी कोकणवासीय जनतेची असलेली मागणी प्रलंबित आहे. या समस्यांवर खासदार राऊत यांनी आपण रेल्वेकडे त्यासाठी आक्रमकपणे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले.
-----
शहर तलावांची
स्वच्छता सुरू
रत्नागिरीः शहरातील सार्वजनिक तलावांमधील पाणी उपसा रत्नागिरी नगरपालिकेकडून केला जात आहे. दोन तलावांची स्वच्छता पूर्ण झाली असून, बाजारपेठ मच्छीमार्केट येथील तलावातील पाणी उपसा सुरू आहे. पंपाद्वारे पाणी उपसा केला जात आहे. पालिकेच्या पाणी विभागाकडून राहिलेले गढूळ पाणी उपसले जाते. त्यानंतर आरोग्य विभागाकडून तलावातील कचरा, पानवेली काढून टाकल्या जातात. बाजारपेठेतील तलावाचे पाणी उपसले जात आहे. भैरी मंदिर आणि विश्वेश्वर मंदिराजवळचे तलाव स्वच्छ करण्यात आले आहे. तेलीआळीतील तलावाचे पाणी आटले आहे. त्यामुळे या तलावातील पाणी उपसा यावर्षी होऊ शकला नाही. परटवणेतील तलावाची सफाई करण्याबाबत अद्याप कोणीच मागणी केलेली नाही. पूर्वी पाणी उपशासाठी लावलेल्या पंपांसाठी इंधन वापरावे लागत होते. ज्या तलावांसाठी इंधन वापरावे लागत होते तेथे रोजचा १ हजार ते १ हजार ५०० रुपये इंधनाचा खर्च येत होता. आता जेथे विजेची सोय आहे तेथे विजेवर पंप चालवून पाणी उपसा केला जात आहे.
------------------
‘राधाकृष्ण’ तर्फे
खळे यांची मैफल
रत्नागिरी ः राधाकृष्ण कलामंच-रत्नागिरीतर्फे शनिवारी (ता. १०) जूनला सायंकाळी ७ वा. शहरातील मारूती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात गीतकार श्रीनिवास खळे यांच्या ''खळ्यांच्या खळ्यात'' हा त्यांच्या समृद्ध संगीतप्रवासाचा आनंद देणारी सुरेल, सुमधूर संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. या मैफलीत येथील गायक कलाकार संध्या सुर्वे, करूणा पटवर्धन, अभिजित भट मैफल रंगवणार आहेत. साथसंगत तबला सचिन भावे, ढोलकी-पखवाज केंदार लिंगायत, हार्मोनियम वरद सोहनी, सिंथेसायझर राजन किल्लेकर, व्हायोलिन उदय गोखले, तालवाद्य हरेश केळकर साथसंगत करणार आहेत तर निवदेन विनायक जोशी करणार आहेत. या मैफलीचे संयोजन सचिन भावे यांचे असून, मुळ संकल्पना (कै.) मिलिंद टिकेकर यांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com