पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे

rat५p५.jpg
०७१६४
तुळशीः कोरडी जमीन बैलांच्या नांगराच्या साहाय्याने नांगरणी करून भातपेरणी करणारे शेतकरी.
----------------
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे
पाऊस लांबणीवर; पाणीटंचाई समस्या तीव्र, शेतीची कामे रखडली
मंडणगड, ता. ५ः ज्येष्ठातली पौर्णिमा अर्थातच वटपौर्णिमा होऊन गेली तरी पावसाचा थांगपत्ताच नाही. मोसमी पावसाच्या भरवशावर अवलंबून असलेले शेतकरी खरीप हंगामातील शेतीकामासाठी सज्ज झाले आहेत; मात्र पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतीकामे रखडली आहेत. शेतकऱ्यांचे डोळे पावसासाठी आभाळाकडे लागले आहेत.
रोहिणी नक्षत्रात धान्याच्या पेरणीची मूठ सोडली जाते. धान पेरणीसाठी शेतजमिनीची नांगरणी करताना कडक जमिनीमुळे शेतकरी आणि नांगर ओढणाऱ्या बैलांची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे कधी एकदाचा पाऊस पडेल यासाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे; मात्र पाऊस काही कोसळत नाही. बरोबर ३ वर्षांपूर्वी ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाने मंडणगडमध्ये हाहाकार माजवला होता. त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. तो जरी दिवस आठवला आणि नुकसानीचे चित्र डोळ्यासमोर आले की, प्रत्येक नुकसानग्रस्तांच्या अंगावर शहारे येतात. कधी समाधानकारक तर कधी अतिनुकसान करणारा तर कधी भरवसा नसलेल्या अशा या लहरी हवामाच्या मोसमी पावसावर कोकणातील शेती अवलंबून आहे. बुजुर्ग आठवणी सांगतात की, नियमित आणि वेळेवर पावसाची सुरवात झाल्यामुळे वटपौर्णिमेलाच भाताची लावणी केली जायची. कितींदा तरी असे घडले आहे; मात्र यावर्षी अजूनही पेरणीच झाली नाही. त्यामुळे लावणी करणे तर दूरची बात राहिली आहे. लांबलेल्या पावसामुळे तालुक्यातील गावागावांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली आहे. अनेक ठिकाणच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. बोरवेलना पाणी येईनासे झाले आहे. नद्या आटल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही काही गावात तर आठवड्यानंतर पाणी सोडले जातेय ते पण पुरसे नसते. टॅंकरने पाणीपुरवठा करायचे म्हटले तर विहिरीनी तळ गाठल्याने आणि नद्या आटल्याने टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवायचे तरी कुठून, हा यक्षप्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
बदलत्या हवामानातील वातावरणाचा फटका पर्जन्यमानावर होत असून, आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहिली तर अनेक ठिकाणच्या लोकांना केवळ पाण्यासाठी स्थलांतर करावे लागणार आहे. त्याचा परिणाम हा दूरगामी होणार आहे. कोकणातील शेती ही मोसमी पावसाच्या भरवशावरच अवलंबून असते. सध्या मोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला असला तरी पाऊस मात्र गायब झाला आहे. त्यामुळे शेतीशी निगडित सर्वच कामे खोळंबली आहेत. याचा थेट परिणाम हा अर्थकारणावर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com