रत्नागिरी-पूर्वमोसमी पावसाचीही पाठ, टंचाईत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-पूर्वमोसमी पावसाचीही पाठ, टंचाईत वाढ
रत्नागिरी-पूर्वमोसमी पावसाचीही पाठ, टंचाईत वाढ

रत्नागिरी-पूर्वमोसमी पावसाचीही पाठ, टंचाईत वाढ

sakal_logo
By

पूर्वमोसमीचीही पाठ,
पाणी टंचाईत वाढ
१०५ गावात टॅंकरने पाणी पुरवठा
रत्नागिरी, ता. ५ ः मोसमीपूर्व पावसानेही पाठ फिरवल्यामुळे उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी जिल्ह्यात टंचाईची संकट गडद होत आहे. जिल्ह्यात सध्या १०५ गावातील १९५ वाड्यांत टँकरने पाणी पुरवठा केला जात असून ३९ हजार १९९ लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. आठ दिवसांमध्ये १४ गावातील २३ वाड्यांची भर पडली आहे.
पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत आहे. त्यामुळे विहिरी, नद्या, नाले कोरडे पडू लागले आहेत. अनेक विहिरी, विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याचा स्रोतच उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना पाणी पाणी करत फिरावे लागत आहे. शासनाकडून टँकरचा पर्याय दिला आहे. मात्र वाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता हे टँकर अपुरे पडत आहेत. खासगी टँकर भाड्याने घेण्याची तरतूद आहे; परंतु शासकीय भाडे परवडत नसल्याने टँकर धारकांकडून पाठ फिरवली जात आहे. शासनाकडूनही भाडे देण्यात येत नाही. परिणामी अनेक गावांमध्ये चार ते पाच दिवसांनी पाण्याचे टँकर पाठवले जात आहेत. सर्वाधिक टंचाईची झळ खेड, संगमेश्‍वर दोन तालुक्यांना बसली आहे. त्यामध्ये उमरे धरणाला गळती लागल्यामुळे या परिसरातील दहा गावातील काही वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाणी कमी मिळत असल्याने तेथील ग्रामस्थांनी पाणी विकत घेतले. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे देणगीदार शोधण्यास सुरवात केली आहे.
जिल्ह्यात १९५ वाड्यांना टँकरचा आधार आहे. यासाठी ४ शासकीय आणि १४ खासगी टँकर घेण्यात आले आहेत. आतापर्यंत १ हजार ३१७ फेर्‍या झाल्या आहेत. ३९ हजार १९९ लोकांना टँकरने पाणी दिले जात आहे. मागील आठवड्यात हा आकडा ३६ हजार ३४४ लोकांना टँकरने पाणी दिले जात होते. मोसमी पाऊस लांबला तर जिल्ह्यात टंचाईची तिव्रता अधिक जाणवणार असून त्यासाठी प्रशासनाला सज्ज रहावे लागणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात ४ गावातील १६ वाड्यांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे. या परिसरातील ११ हजार १२५ लोकांना टंचाईची झळ बसत आहे. आतापर्यंत सुमारे ३०० फेऱ्या पाणी पोचवण्यात आले आहे.

चौकट
तालुका गाव वाड्या लोकसंख्या
*मंडणगड *७ *१० *१३३९
*दापोली *६ *१६ *१५५०
*खेड *३० *५२ *७४६०
*गुहागर *६ *६ *८५६
*चिपळूण *१६ *२६ *३९९२
*संगमेश्‍वर *३१ *६२ *१२०४१
*रत्नागिरी *४ *१६ *१११२५
*लांजा *५ *७ *८३६