रत्नागिरी- सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

रत्नागिरी- सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद

rat५p१२.jpg-
०७१८४
रत्नागिरी ः रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित सायकल रॅलीत सहभागी सायकलिस्टचे माळनाका येथील स्कायवॉकवरून टिपलेले छायाचित्र.
- rat५p१३.jpg ः
०७१८५
सायकल रॅलीमध्ये सहभागी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि सायकलिस्ट.
- rat५p१४.jpg
०७१८६
मांडवी येथे सायकल रॅलीच्या सांगतेप्रसंगी सायकलिस्ट.
----------

लोगो......जागतिक सायकल दिन

डोंगरदऱ्या, चढ-उतारावरून सायकलिंगचा थरार

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजित ; सायकल रॅलीत १०९ स्वारांचा सहभाग

रत्नागिरी, ता. ५ ः डोंगरदऱ्या, चढ-उतार असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सायकलिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब शहरात आयोजित सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यात लहान- मोठे, महिला असे १०९ हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले. विशेष म्हणजे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अन्य पोलिसांनीदेखील या रॅलीत सुरवातीपासून शेवटपर्यंत सायकल चालवून सर्व सायकलस्वारांना प्रोत्साहन दिले.
दरवर्षी ३ जूनला जागतिक सायकल दिन साजरा होतो. या निमित्त जगभरात विविध उपक्रम आयोजित केले जातात. रत्नागिरीत रविवारी सकाळी ७ वा. मारूती मंदिर येथून रॅलीला सुरवात करण्यात आली. या प्रसंगी पोलिस अधीक्षक यांनी सांगितले, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्य सुरेख प्रकारे सुरू आहे. सायकलिंगमुळे शरीराचा चांगला व्यायाम होतो व माणूस तंदुरुस्त राहतो. लहान-मोठ्यांनी सायकलिंग केले पाहिजे. त्यानंतर रॅलीला सुरवात झाली. या रॅलीने रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. रॅलीमध्ये ७ ते ७८ या वयोगटातील १०९ सायकलप्रेमी सहभागी झाले. यात लहान मुलांसह डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँकर्स, विद्यार्थी, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आरसीसीचे रायडर्स सहभागी झाले. वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रॅली ठरल्याप्रमाणे वेळेत सकाळी ७ वा. मारूती मंदिर सर्कल इथून सुरू झाली. नाचणे, साळवी स्टॉप, माळनाका, रामआळी, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, टिळक आळीमार्गे मांडवी येथपर्यंत काढण्यात आली.
रॅलीदरम्यान विविध घोषणा सायकलप्रेमींकडून देण्यात आल्या. सांगतेदरम्यान रत्नागिरीतील एकमेव डबल एसआर अमित कवितके, एसआर यतिन धुरत, एसआर डॉ. नितीन सनगर यांनी सर्व सायकलप्रेमींना सायकलविषयक मार्गदर्शन केले. या प्रसंगी २० वर्षांखालील सायकलप्रेमींसाठी खास लकी ड्रॉमध्ये सायकलिंगसंदर्भातील वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. सायकलिस्ट सदस्य, रत्नागिरीकर आणि पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने ही रॅली यशस्वी केली. सायकलपटूंसाठी पाणी, अल्पोपाहाराची व्यवस्था, डिझाईन, प्रिंटिंग आदी सर्व व्यवस्था केली होती.
----------
चौकट
रत्नागिरीत रुजणार सायकल संस्कृती
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य होण्याकरिता आठवड्याला किमान ७५ व महिन्याला किमान ३०० किमान किलोमीटर सायकल चालवण्याचे अनोखे शुल्क आकारले जाते. रत्नागिरीत सध्या १००हून अधिक सायकलस्वार क्लबचे सदस्य असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर अनेक सायकलिस्ट आता रत्नागिरीच्या रस्त्यावर दिसू लागले आहेत. रत्नागिरीत सायकलसंस्कृती सुरू व्हावी आणि वृद्धिंगत व्हावी यासाठी रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब अनेकविध उपक्रम राबवत आहे.
-------
चौकट
सायकलवरून पेट्रोलिंग केले पाहिजे ः कुलकर्णी
रत्नागिरी जिल्हा पोलिस दल आपल्या सर्व उपक्रमात सहभागी होईल. कुलकर्णी यानी या रॅलीमध्ये स्वतः सायकल चालवली. त्यांनी सर्व सहभागी सायकलस्वारांना प्रोत्साहित केले. सायकलवरून पेट्रोलिंग केले पाहिजे, असा विचार या रॅलीच्यानिमित्ताने माझ्या मनात पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com