मळेवाडमध्ये काजू बागेत अज्ञात वृद्धाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळेवाडमध्ये काजू बागेत
अज्ञात वृद्धाचा मृतदेह
मळेवाडमध्ये काजू बागेत अज्ञात वृद्धाचा मृतदेह

मळेवाडमध्ये काजू बागेत अज्ञात वृद्धाचा मृतदेह

sakal_logo
By

मळेवाडमध्ये काजू बागेत
अज्ञात वृद्धाचा मृतदेह
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ५ ः येथील भटवाडी (घोलीत) परिसरात आज सकाळी ८ च्या सुमारास काजूच्या बागेत एका वृद्धाचा मृतदेह तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला आढळला. त्यांनी याबाबत मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांना फोन करून माहिती दिली. उपसरपंच मराठे यांनी सावंतवाडी पोलिसांत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
मृतदेह विच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. अति मद्यप्राशनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला. संबंधित व्यक्तींची ओळख पटली नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यांच्या अंगावर पांढरा फुल्ल हाताचा शर्ट व निळी हाफ पँट असे कपडे आहेत. घटनास्थळी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपसरपंच मराठे, हवालदार बाबू जाधव, पोलिस पाटील दिगंबर मसूरकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक आदी उपस्थित होते.