मडुरा रस्त्यावरील पूल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरा रस्त्यावरील पूल धोकादायक
मडुरा रस्त्यावरील पूल धोकादायक

मडुरा रस्त्यावरील पूल धोकादायक

sakal_logo
By

07275
मडुरा ः येथे पुलाच्या दुरवस्थेची पाहणी करताना सरपंच उदय चिंदरकर, प्रकाश वालावलकर व उल्हास वालावलकर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मडुरा रस्त्यावरील पूल धोकादायक

सरपंच चिंदरकर; तात्पुरत्या दुरुस्तीसह नूतनीकरणाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः बांदा-शेर्ले मार्गे मडुरा रस्त्यावरील मारुती मंदिर नजीकचा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलाच्या खालील भागातील स्लॅब कोसळल्याने लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे हा पूल धोकादायक झाला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी व पावसाळ्यानंतर तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सरपंच उदय चिंदरकर यांनी केली.
बांदा-शेर्ले मार्गे मडुरा रस्त्यावरील पूल स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९३० मध्ये वालावलकर कुटुंबीयांकडून बांधण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजेच या पुलाला तब्बल ९३ वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईची पाहणी सरपंच चिंदरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, उल्हास वालावलकर यांनी केली. यावेळी पुलाची धोकादायक स्थिती निदर्शनास आली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने पुलालगत असलेली संरक्षक भिंत तोडली. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याचा आरोप यावेळी प्रकाश वालावलकर यांनी केला. या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यात हा पूल कोसळल्यास मडुरा दशक्रोशीतील नागरिकांसमोर मोठी समस्या उभी राहणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची पाहणी करून तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
---
चौकट
कामासाठी पाठपुरावा करणार
शेर्ले-मडुरा दरम्यान रस्ता डांबरीकरणाचे काम मंजूर आहे. शेर्लेपासून सुमारे एक किलोमीटर रस्त्याचे खडीकरणाचे काम महिनाभरात संबंधित ठेकेदाराने रडतखडत केले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने आता पुढच्या वर्षीच डांबरीकरण होणार, हे निश्चित आहे. तत्पूर्वी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, असे सरपंच चिंदरकर यांनी सांगितले.