रत्नागिरी- गोगटे महाविद्यालयास मिळाली स्वायत्तता

रत्नागिरी- गोगटे महाविद्यालयास मिळाली स्वायत्तता

rat५p२७.jpg-
०७२१५
रत्नागिरीः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयास युजीसीकडून स्वायत्तता मिळाल्याबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे यांचे अभिनंदन करताना प्र. प्राचार्य पी. पी. कुलकर्णी. (मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)
---------------
युजीसीकडून ‘गोगटे-जोगळेकर’ला स्वायत्तता
कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन यांची माहिती; विशेष अभ्यासक्रम बनवण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा स्वायत्तता प्रस्ताव विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडून (युजीसी) मान्य केला आहे. यामुळे कोकणसाठी कौशल्य विकासासाठी विशेष अभ्यासक्रम बनवण्याची संधी मिळाली आहे. एमबीए कॉलेजही सुरू करण्यात येणार आहे. पदवी मुंबई विद्यापिठाची मिळणार असली तर अभ्यासक्रम, परीक्षा व वेळेत निकाल लावण्याचा अधिकार महाविद्यालयास आहे. दहा वर्षांसाठी ही मान्यता मिळाली आहे, अशी माहिती र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला कार्यवाह सतीश शेवडे आणि प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्यासह सर्व शाखांचे उपप्राचार्य उपस्थित होते. २०२३- २४ मे २०३२- ३३ अशी दहा वर्षे स्वायत्तता प्रदान केली आहे. मुंबई विद्यापिठाचा सर्वोत्तम महाविद्यालयाचा पुरस्कारही गोगटे महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. स्वायत्त दर्जा मिळाल्याने महाविद्यालयास अभ्यासक्रमाची पुनर्रचना करता येईल. स्थानिक गरजा व जागतिक मागणी यांचा विचार अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना होईल. परीक्षांचे नियोजन अधिक सुरक्षितपणे करणे आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गुणपत्रके देणे महाविद्यालयाला स्वायत्ततेमुळे करता येणार आहे.
शिल्पाताई म्हणाल्या, भविष्यात अधिक वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करणे आता सोपे होईल. आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमांमधील बदल कमी अंतराने वारंवार करता येतील. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून प्रथम वर्षापासून ते पदव्युत्तर वर्गापर्यंत सर्व अभ्यासक्रमः स्वायत्त व्यवस्थेमध्ये सुरू होतील. पुढील महिनाभरात विविध प्राधिकरणांची रचना होऊन पुढील वर्षाचे नियोजन आणि अभ्यासक्रमांमधील बदल यांना अंतिम स्वरूप दिले जाईल. कॉलेजची ६० हजार चौरस फुटांची नवीन इमारत बांधणीचे काम सुरू आहे. १२ कोटी रुपयांच्या या इमारतीमध्ये एमबीएचा कोर्स, सर्व प्रयोगशाळा, १६ वर्गखोल्या असतील. या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, रजिस्ट्रार रवींद्र केतकर, प्रसाद तथा बापू गवाणकर आदी उपस्थित होते.

चौकट १
७५ वर्षांची परंपरा
महाविद्यालयास ७५ वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी नॅकच्या ४ मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाने अ श्रेणी मिळवली आहे. ११ व १२व्या पंचवार्षिक योजनेत महाविद्यालयास आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले. त्याचप्रमाणे शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभागाकडूनही सुमारे दीड कोटी रुपयांचे विशेष अनुदान प्राप्त झाले आहे.

कोट
महाविद्यालयास स्वायत्तता मिळाल्याचा सार्थ अभिमान वाटतो. हा महाविद्यालयाच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरेल. विद्यार्थी अधिक ताकदीने सक्षम होईल. जगाच्या बाजारात आमचे विद्यार्थी खंबीरपणे उभे राहतील याकरिता प्राचार्य व सर्व प्राध्यापक ही जबाबदारी पार पाडू. भविष्यात डिम्ड युनिव्हर्सिटी होण्याकडे ही वाटचाल आहे.
- डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्र. प्राचार्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com