चिपळूण तालुक्यातील दोन परवाने निलंबित

चिपळूण तालुक्यातील दोन परवाने निलंबित

चिपळुणातील दोन कृषिसेवा
केंद्रांचे परवाने निलंबित
निरीक्षकांतर्फे तपासणी ; जिल्ह्यात दहा भरारीपथके
चिपळूण, ता. ५ः जिल्हा कृषी विभागातील गुणनियंत्रण विभागातर्फे निविष्ठांच्या दर्जा व गुणवत्ता तपासणी मोहीम सुरू आहे. भरारी पथकाद्वारे चिपळुणातील परवानाधारक कृषिसेवा केंद्राची तपासणी करताना २ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. त्यामध्ये आणेराव कृषिसेवा केंद्र आणि कृषिमित्र सेवाकेंद्रांचा समावेश आहे, अशी माहिती गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक सागर साळुंखे यांनी केली आहे.
ते म्हणाले, खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये भात व नागली ही प्रमुख दोन पिके घेतली जातात. चालू खरीप हंगामात पीक उत्पादनासाठी आवश्यक निविष्ठांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आवश्यक खत, बियाणे व कीटकनाशके बाजारामध्ये उपलब्ध झाली आहेत. या निविष्ठांचा दर्जा व गुणवत्ता तपासण्यासाठी जिल्ह्यात दहा भरारीपथके स्थापन केली असून, २९ अर्धवेळ निरीक्षक कार्यरत आहेत. या निरिक्षकांतर्फे चिपळुणातील परवानाधारक कृषिसेवा केंद्रांची तपासणी केली आहे.
या तपासणीमध्ये काही कृषिसेवा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे स्टॉक रजिस्टर न ठेवणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागावर न लावणे, वेळेत परवाने अद्ययावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, परवाना काढलेला आहे; परंतु कोणताही व्यवसाय केला जात नसल्याचे तपासणीदरम्यान आढळले. त्यामुळे चार परवानाधारक कृषिसेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यामध्ये अणेराव कृषिसेवा केंद्र आणि कृषिमित्र सेवाकेंद्राचा समावेश आहे. सर्व परवानाधारक कृषिसेवा केंद्रचालकांनी बियाणे कायदा १९६६, खतनियंत्रण आदेश १९८५ व कीटकनाशके कायदा १९६८ मधील तरतुदीचे पालन करून तपासणी पथकाला नियमानुसार सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी व होणारी कारवाई व आपले नुकसान टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------
चौकट
सेवाकेंद्रात आलेले खत पडून
पावसाळा जवळ आला तरी शेतकऱ्यांनी अजून खतांची खरेदी करण्यास सुरवात केलेली नाही. त्यामुळे सेवाकेंद्रात आलेले खत पडून राहिले आहे. त्यामुळे कंपन्यांकडून होणारी खताची खरेदी विक्री थांबली आहे. तालुक्याला खतांचा पुरवठा वेळेवर होतो. त्यामुळे काळाबाजार होत नाही. त्यामुळे २६६ रुपये पोते याप्रमाणे युरिया खत विकले जात आहे. मंगळवारी चिपळुणात खताची गाडी येणार आहे त्यानंतर बुधवारपासून युरिया खताच्या खरेदी-विक्रीला वेग येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com