खाजगी बसच्या धडकेत 
कासार्डे येथे एक गंभीर

खाजगी बसच्या धडकेत कासार्डे येथे एक गंभीर

खाजगी बसच्या धडकेत
कासार्डे येथे एक गंभीर

चालकावर पोलिस ठाण्यात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. ५ ः भरधाव खाजगी प्रवाशी बस चालकाने दुचाकीला धडक दिल्याने एक गंभीर जखमी झाला. वैभववाडी रस्त्यावर कासार्डे येथील हॉटेल भैरीभवानी समोर आज सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. चंद्रकांत आकाराम पाताडे (रा.कासार्डे तर्फेवाडी), असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बस चालक मनोहरसिंग मधुसिंग राजपूत (रा. नैयझर, जि.उदयपुर, राजस्थान) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणी अरुण दत्तात्रय बंड (वय ६७, रा. कासार्डे बडवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. कासार्डेत रस्त्यालगत भैरीभवानी हॉटेल आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास वैभववाडीकडून तळेरेच्या दिशेने चंद्रकांत पाताडे हे दुचाकीने (एम.एच.०७ ए.ई.१९४८) जात असताना हा अपघात झाला. यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. यात खासगी बसचा (ए.आर.०१ टी २५२३) चालक मनोहरसिंग मधुसिंग राजपूत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com