‘वंदे भारत’ला कुडाळात थांबा द्या

‘वंदे भारत’ला कुडाळात थांबा द्या

07348
कुडाळ ः येथील रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी आज येथे सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)

‘वंदे भारत’ला कुडाळात थांबा द्या

सर्वपक्षीयांचे आंदोलन; रेल्वेप्रशासनास निवेदन सुपूर्द

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ ः कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा द्यावा तसेच नवीन सुरू होत असलेल्या ‘वंदे भारत’ आणि अन्य एक्स्प्रेसना थांबा मिळावा, या मागण्यांसाठी आज येथे सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयांकडून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेले निवेदन येथील रेल्वेस्थानक प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, ‘‘कुडाळ रेल्वेस्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्थानक असून हा मार्ग ८५० किलोमीटरचा आहे. या मार्गावरील रोहा ते कुडाळ हे ४२५ किलोमीटर अंतर आहे. कुडाळ ते मेंगलोर हे अंतर ४२५ किलोमीटर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा १९९५ मध्ये संपूर्ण भारतामध्ये पहिल्या प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला; परंतु २७ वर्षांत पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याचा म्हणावा तसा विकास होऊ शकला नाही. कोकण रेल्वे मार्गावर अनेक गाड्या संपूर्ण भारतातून धावत आहेत; परंतु त्यातील बहुतांश गाड्यांना जिल्ह्यात एकही थांबा नाही. कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ स्थानक हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. पर्यटनदृष्ट्या विकसित झालेल्या मालवण, आंबोली धबधबा हिल स्टेशन, चिपी एअरपोर्ट, कुडाळ एमआयडीसीला सर्वात जवळचे कुडाळ स्थानक आहे. त्यामुळे नवीन सुरू होत असलेल्या ‘वंदे भारत’ आणि पुणे, मेंगलोर एक्स्प्रेसला जिल्ह्यात तात्काळ थांबा देण्यात यावा. येथील स्थानकाला असलेल्या भूसंपादित जागेचा विचार करता येथे टर्मिनस होण्यासाठी प्रामुख्याने विचार करणे आदी मागण्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास कुडाळवासीयांच्यावतीने रेल्वे आंदोलन छेडण्यात येईल.’’
................
स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
याबाबत आज येथील रेल्वे स्थानकावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. कुडाळमधील स्थानिक नागरिक व चाकरमानी, प्रवाशांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संजय पडते, धीरज परब, अभय शिरसाट, अतुल बंगे, काका कुडाळकर, सुनील भोगटे, संदेश पडते, श्रीराम शिरसाट, मंदार शिरसाट, आफ्रीन करोल, राजन नाईक, रुपेश पावसकर, बंड्या कोरगावकर, संदीप महाडेश्वर, गुरुनाथ गडकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com