शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे
विलवडे येथे आज अनावरण

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे विलवडे येथे आज अनावरण

07346
छत्रपती शिवरायांचा पुतळा.

शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे
विलवडे येथे आज अनावरण
ओटवणे, ता. ५ ः विलवडे येथील शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे राजा शिवाजी विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण उद्या (ता. ६) सकाळी दहाला सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा छत्रपती कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायक दळवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी सहाला फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गड येथून शिवज्योत कार्यक्रमस्थळी निघणार आहे. विलवडे, भालावल आणि सरमळे ग्रामपंचायत येथून ग्रामस्थ व महिलांचे रॅलीने आगमन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. छत्रपतींच्या पुतळ्याची पूजा व त्यानंतर ध्वजाचे अनावरण करण्यात येईल. यानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’, या नामफलकाचे अनावरण होणार आहे. या सोहळ्यानिमित्त विलवडे शिवप्रेमी मित्रमंडळातर्फे राजा शिवाजी विद्यालय येथे रात्री आठला आमनेसामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन केले आहे. हा सामना सरमळे येथील ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे बुवा संजय गावडे आणि विलवडे येथील स्वामी समर्थ माऊली प्रसाद प्रासादिक भजन मंडळाचे बुवा महेश नाईक यांच्यात होणार आहे. शिवाजी महाराजांवर व्याख्यान व पोवाडे आदी कार्यक्रम होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com