वेंगुर्ले नगरपरिषदेस कोटीचे बक्षीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्ले नगरपरिषदेस कोटीचे बक्षीस
वेंगुर्ले नगरपरिषदेस कोटीचे बक्षीस

वेंगुर्ले नगरपरिषदेस कोटीचे बक्षीस

sakal_logo
By

07364 - वेंगुर्ले नगरपरिषद

वेंगुर्ले नगरपरिषदेस कोटीचे बक्षीस
‘माझी वसंधुरा’मध्ये कोकणात अव्वल; राज्यात दहावी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ ः येथील नगरपरिषदेने माझी वसुंधरा तिसरे पर्व (२०२३) अभियानात कोकण विभागीय स्तरावर प्रथम क्रमांकासह एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले तर राज्यात दहावा क्रमांक मिळविला. या यशामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
माझी वसुंधरा अभियान एक एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत झाले. समितीने याचे मुल्यमापन मेमध्ये केले होते. त्यात पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश आदी निकष होते. वेंगुर्ले नगरपरिषदेने भूमी या निकषाखाली केलेली वृक्ष लागवड, वायू या निकषागाली केलेले हवेतील प्रदूषण तसेच प्रदूषणकारी घटकांचे नियंत्रण, जल निकषाखाली जल प्रदूषण टाळणे, वेंगुर्ले शहराला पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या निशाण तलावातील पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व पुनर्जीवन, पाण्याचे लेखापरीक्षण केले होते. अग्नी या निकषाखाली नगरपरिषद इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प, नगरपरिषद इमारती व सुविधा ऊर्जा लेखा परीक्षणद्वारे ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न केले. अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा विकास केला. इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी सोईसुविधा निर्माण केल्या. आकाश निकषाखाली माझी वसुंधरा जनजागृती केली. शहरात आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती दर्शविणारी भित्तिचित्रे व वैज्ञानिक माहिती दिली. स्वच्छता उत्सव घेऊन त्यात निबंध, चित्रकला स्पर्धा घेतल्या. त्यातून माझी वसुंधरा कार्यक्रमास प्रोत्साहन दिले. पर्यावरण दूत नेमले. हरित क्षेत्रांची निर्मिती व संवर्धन केले. वेंगुर्ले नगरपरिषदेने या अभियानातंर्गत राबविल्याने नगरपरिषदेला ७६०० गुण मिळाले असून ही नगरपरिषद कोकण विभागात प्रथम व राज्यात दहावी आली आहे. एक कोटी रकमेपैकी ५० टक्के रक्कम हरितक्षेत्र वाढविण्यासाटी व उर्वरित ५० टक्के रक्कम पर्यावरण पूरक व इतर उपाय योजनासाटी वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली.