कानूरकर, पावसकर यांना अहमदनगर येथे नियुक्तीपत्रे

कानूरकर, पावसकर यांना
अहमदनगर येथे नियुक्तीपत्रे

07457
अहमदनगर ः निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हाध्यक्ष प्रकाश कानूरकर व राज्य सदस्य लक्ष्मण पावसकर यांना नियुक्ती पत्र देताना राज्य पदाधिकारी व मान्यवर.

कानूरकर, पावसकर यांना
अहमदनगर येथे नियुक्तीपत्रे
ओरोस, ता. ६ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय कार्यकारिणी सदस्य प्रशिक्षण कार्यशाळा समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मंडळाचे नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रकाश कानूरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण पावसकर यांना नियुक्तीपत्रे देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्यभरातील एकूण ३६ जिल्ह्यांतील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष, सचिव व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची प्रबोधनात्मक व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉ. विकास महात्मे, सारथी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, डॉ. सुधा कांकरिया, अहमदनगर उपवंरक्षक सुवर्णा माने, प्राथमिक शिक्षण माजी संचालक दिनकर टेमकर, राज देशमुख आदी उपस्थित होते. राज्यअध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या प्रेरणेतून त्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम झाला. वनश्री मोरे उपस्थित होत्या. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष कानूरकर यांनी प्रतिक्रिया देताना समाजातील प्रत्येक मनुष्याने एकदा तरी राळेगणसिद्धीला अवश्य भेट देऊन डॉ. अण्णा हजारे यांचा इतिहास पाहावा, असे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com