‘शब्द शंकरपाळी’ समुहाचा मुंबईत गुणगौरव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शब्द शंकरपाळी’ समुहाचा 
मुंबईत गुणगौरव सोहळा
‘शब्द शंकरपाळी’ समुहाचा मुंबईत गुणगौरव सोहळा

‘शब्द शंकरपाळी’ समुहाचा मुंबईत गुणगौरव सोहळा

sakal_logo
By

07662
बांदा ः येथे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक.

श्री स्वराज्य प्रतिष्ठानमार्फत
बांद्यात ‘शिवराज्याभिषेक’
बांदा ः छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आताच्या पिढीला देणे गरजेचे आहे. विचारांचे वहन करण्यासाठी शाळा पातळीवर विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना छत्रपतींचे विचार देऊन प्रेरित करा, तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य व विचार हे प्रत्येकाच्या मनामनात व घराघरात पोहोचतील, असे प्रतिपादन श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर यांनी येथे केले. येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत शिवराज्याभिषेक दिन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक व धार्मिक पद्धतीने प्रशालेचा विद्यार्थी नैतिक मोरजकर याच्या हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. प्रतिष्ठानचे खजिनदार भूषण सावंत यांनी उपस्थितांना शिवविचारांवर मार्गदर्शन केले. त्यांनी इतिहासातील विविध विषयांचे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंचे, त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे दाखले दिले. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते उत्कृष्ट शासक तर होतेच; मात्र रयतेच्या मनातील जाणणारे जाणते राजा होते. त्यांच्या कार्यपाद्धतीमुळेच स्वराज्याचा विस्तार झाला. त्यांचे कार्य व विचार आताच्या पिढीने आत्मसात करावे, असे उपाध्यक्ष केदार कणबर्गी यांनी सांगितले. आभार संकेत वेंगुर्लेकर यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघांचे सचिव गुरुनाथ नार्वेकर, केंद्रप्रमुख संदीप गवस, बाबी वसकर, मंथन सावंत, जगन्नाथ सातोसकर, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, वेदिका गावडे आदी उपस्थित होते.
----
07661
मुंबई ः ‘शब्द शंकरपाळी’च्या स्नेहसंमेलनात पुरस्कार प्राप्त साहित्यिकांसोबत मान्यवर.

‘शब्द शंकरपाळी’चा मुंबईत गुणगौरव
तळेरे : जिल्ह्यातील शिरवल गावच्या भूषण तांबे यांच्या ‘शब्द शंकरपाळी साहित्य समूह’ या साहित्यिक संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि साहित्यिक गुणगौरव सोहळा दादर येथे उत्साहात झाला. यावेळी साहित्यिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध युवा कवी प्रदीप बडदे उपस्थित होते. समूह संस्थापक भूषण तांबे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी साहित्यिकांनी नेहमी प्रामाणिक असावे आणि नेहमीच दुसऱ्यांच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे असावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर साहित्यिकांचा गुणगौरव सोहळा झाला. सुनीता कोठावदे यांनी सादर केलेल्या ''सत्यम शिवम सुंदरम'' या गाण्याने कार्यक्रमात अधिक रंगत आली. या सोहळ्यास महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून अनेक मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली. पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानचिन्ह, पदक आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवोदित कवी सिद्धेश उतेकर यांनी केले. आभार सुदर्शन जाधव यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.