पवार यांचा कणकवलीत सत्कार

पवार यांचा कणकवलीत सत्कार

०७२६७
कणकवली : तुषार पवार यांचा सत्कार करताना श्री. डिचोलकर. शेजारी आनंद पारकर, अनिल मुंज, चेतन मुंज, भैय्या आळवे, कल्याण पारकर आदी.

पवार यांचा कणकवलीत सत्कार
कणकवली ः युपीएससी परीक्षेत यश मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या तुषार दीपक पवार याचा कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तुषार पवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत युपीएससी परीक्षेत यश मिळवित जिल्ह्यातील युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तुषार यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. डिचोलकर, आनंद पारकर, अनिल मुंज, भैय्या आळवे, चेतन मुंज, कल्याण पारकर यांच्यासह तुषार यांचे वडील दीपक पवार हे उपस्थित होते.
---
०७३०५
मालवण ः रामेश्वर चरणी गाऱ्हाणे घालण्यात आले.

नाना पटोलेंसाठी मालवणात गाऱ्हाणे
मालवण ः काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील तालुका काँग्रेसच्या वतीने शहरातील रामेश्वर मंदिरात येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सरकार येऊन ‘नाना मुख्यमंत्री होऊंदेत’ असे गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी श्रीदेव रामेश्वराची दुग्धभिषेक पूजाही करण्यात आली. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, संदेश कोयंडे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष देवानंद लुडबे, श्रेयस माणगावकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com