
दाभोळ-कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपदी डॉ. संजय भावे
पान १ साठी
०७६३०
कोकण कृषी विद्यापीठाच्या
कुलगुरूपदी डॉ. संजय भावे
दाभोळ, ता. ६ ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती केल्याचे राज्यपालांनी आज जाहीर केले. डॉ. संजय भावे कोकण कृषी विद्यापीठात अॅग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी २८ मे रोजी निवड समिती समोर उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. त्यातील पाच जणांची निवड करून ती नावे राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर या पाच जणांची मुलाखत घेऊन राज्यपाल अंतिम नाव जाहीर करतात. त्यानुसार राज्यपाल रमेश बैस यांनी डॉ. संजय भावे यांची कुलगुरूपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यांचे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गडीताम्हाने आहे. त्यांनी बी.एस्सी., एम.स्सी. आणि पीएच.डी. कोकण कृषी विद्यापीठातून केली आहे.
डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. तर, डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत, तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.