
उभादांडा येथे 148 जणांची चिकित्सा
swt७२३.jpg
०७९३६
वेंगुर्लेः आरोग्य शिबिरात सुनील रेडकर यांनी मार्गदर्शन केले.
उभादांडा येथे १४८ जणांची चिकित्सा
आरोग्य शिबिरास प्रतिसादः ग्रामपंचायत, रोटरीचा संयुक्त उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ८ः अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था, खेडशी-मोपा, उभादांडा ग्रामपंचायत व रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले यांच्यावतीने उभादांडा शाळा नं. ३ च्या अंगणवाडी येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाचा १४८ जणांनी लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत संसारे यांच्या हस्ते झाले. रोटरीचे अध्यक्ष सुनील रेडकर यांनी रोटरीच्या समाजोपयोगी कार्याची माहिती दिली. भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये असलेल्या सुसज्ज हॉस्पिटलची सोय असून येथे पंचतारांकित हॉस्पिटलप्रमाणे येथे वैद्यकिय शिक्षण देऊन माफक दरात रुग्णांवर औषधोपचार केले जातात. सिंधुदुर्गातील जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संसारे यांनी केले. सरपंच नीलेश चमणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, रमेश नार्वेकर, तंटामुक्ती अध्यक्ष आनंद मोचेमाडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोचेमाडकर आदी उपस्थित होते.
राजेश घाटवळ व नितीन कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, पंकज शिरसाट यांनी आभार मानले. रोटरीचे दादा साळगावकर यांनी या शिबिराच्या यशस्वीतेची जबाबदारी पार पाडली. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. अखिलेश शुक्ला, डॉ. राजेश रुके, डॉ. दीपा शिरोडकर, डॉ. सायली कासार, फार्मासिस्ट भक्ती चव्हाण व दर्शन सावंत, स्टाफ नर्स सुमा नाईक, पिकी मेडिकल स्टाफ शशिकांत तिरोडकर, रामा करंगुटकर, सागर धुरी, स्थानिक आरोग्य सेविका इदालिन कार्डोज, अंगणवाडी सेविका, स्थानिक आशा वर्कर तसेच रोटरीचे योगेश नाईक, आनंद बोवलेकर, मुकुल सातार्डेकर, प्रथमेश नाईक, दीपक ठाकूर, राजू वजराटकर, सुरेंद्र चव्हाण यांनी सहाय्य केले. रोटरी जिल्हा ३१७० चे सचिव अशोक नाईक यांच्या हस्ते उपस्थित डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.