बांदा नट वाचनालयात 
शिवराज्याभिषेक दिन

बांदा नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिन

07943
बांदा ः नट वाचनालयात शिवराज्याभिषेकदिनी दीपप्रज्वलन करताना अध्यक्ष एस. आर सावंत. शेजारी प्रकाश पाणदरे, सचिव राकेश केसरकर, हेमंत मोर्ये, स्वप्निता सावंत आदी.

बांदा नट वाचनालयात
शिवराज्याभिषेक दिन
बांदा, ता. ७ ः येथील नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्य, न्याय, आणि शिस्तीचे आदर्श, गरिबांचे कैवारी, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांचा उदो उदो होतो. ६ जून १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवरायांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक काशी क्षेत्री प्रसिद्ध असलेले पंडित गागाभट्ट यांनी वैदिक विधीनुसार केला. या दिवसाचे प्रतीक म्हणून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतो. बांदा वाचनालयात छत्रपतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व माननीय विद्यमान अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक जगन्नाथ सातोस्कर, हेमंत मौर्य, स्वप्निता सावंत, प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, गणपत नाईक, ग्रंथपाल प्रमिला मोरजकर-नाईक, अमिता परब, सुनील नातू आदी उपस्थित होते. भाटे व अध्यक्ष सावंत यांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार मांडले. सचिव राकेश केसरकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com