संक्षिप

संक्षिप

१८ (पान ५ साठी)

- rat७p२.jpg-
२३M०७७३४
जालगाव ः पर्यावरणदिनानिमित्त वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करताना पर्यावरणप्रेमी.

आम्रपालीत पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी विशेष सहल

दाभोळ ः जागतिक पर्यावरणदिनानिमित्त प्रशांत परांजपे यांनी आम्रपाली ग्रामसहवास होम स्टेच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी पर्यटकांसाठी विशेष सहलीचे आयोजन केले होते. वातावरण बदल या विषयातील तज्ज्ञ राधिका कुलकर्णी यांच्यासह अनेक पर्यटक खास निसर्गाची ओळख करून घेण्यासाठी त्यांच्या पर्यटन संकुलात आले होते. पर्यावरणदिनानिमित्त आम्रपाली येथे वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी मूळ आम्रवृक्षाला (रायवळ) सजवण्यात आले होते. औक्षण करण्यात आले आणि सेंद्रिय खताचा केक वृक्षवल्लीला देण्यात आला. या वेळी प्रशांत परांजपे यांनी वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षांचे संवर्धनही महत्वाचे असून वृक्ष आणि पाणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांचं संवर्धन महत्वाचं असून, अशाप्रकारे दररोज पर्यावरणदिन साजरा करून धरणीमाता आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचं इवलं तरी योगदान असण अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केले.
---

बांदल स्कूल दहावीचा निकाल शंभर टक्के

चिपळूण ः येथील पेरेंट्स एज्युकेशन सोसायटी संचलित लक्ष्मीबाई मारूतीराव बांदल स्कूलचा दहावीचा निकाल या वर्षीही १०० टक्के लागला आहे. परीक्षेला एकूण ४५ विद्यार्थी बसले होते. विद्यालयात प्रथम आयान मापकर (८८.२० टक्के), द्वितीय शर्वरी गायकवाड ( ८८), तृतीय मासूमा शिरगावकर (८७.२०) टक्के गुण मिळवून यश मिळवले. एकूण विद्यार्थ्यांपैकी विशेष श्रेणीमध्ये १९ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १३, द्वितीय श्रेणीत १२ तसेच १ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन भास्कर जाधव, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापिका वहिदा परकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

--

चिपळुणात जिल्हा काँग्रेसची आज बैठक

चिपळूण ः रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक १० जूनला सकाळी ११ वा. ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी संध्याकाळी ५ वा. चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष, सेवादल अध्यक्ष, विद्यार्थी संघटना अध्यक्ष, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. १० जूनला संध्याकाळी ५ वा. काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. हे संपर्क कार्यालय सुसज्ज व्हावे यासाठी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव प्रयत्न करत आहेत. या प्रसंगी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष यादव यांनी केले आहे.

-

नवजीवन महाविद्यालयातील
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

राजापूर ः राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित नवजीवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेमध्ये सुयश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्था आणि कॉलेजतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. संस्थाध्यक्ष सुलतान ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार हनिफ काझी, सदस्य अशफाक काझी, नझीर टोले, हसीना मुकरी, प्राचार्य राजेंद्रकुमार व्हनमाने आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रके विभागीय मंडळाकडून नुकतीच कॉलेजला प्राप्त झाली. त्यानंतर संस्था आणि कॉलेजच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये विज्ञान शाखेतील सिद्धी मोहिते, आदिती शिवदे, यश परवडे, वाणिज्य शाखेतील राजश्री मांडवकर, श्रद्धा चव्हाण, साहिल भेरे, कला शाखेतील सना मौला, झोया मुल्ला, धनराज लिंगायत या विविध शाखांमधून प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्‍या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कनिष्ठ महाविद्यालय आणि हायस्कूलमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

--

- ratchl७३.jpg
२३M०७८४०
ःचिपळूण ः तायक्वांदोच्या ब्लॅकबेल्ट परीक्षेत यशस्वी ठरलेली सई कोतकुंडे व आदिती पवार.

तायक्वांदोत कोतकुंडे, पवारची बाजी

चिपळूण ः औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या तायक्वांदोच्या ब्लॅक बेल्ट परीक्षेत चिपळूणच्या दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. तायक्वांदोमधील शेवटची असलेल्या या परीक्षेत सई कोतकुंडे आणि आदिती पवार यशस्वी ठरल्या आहेत. या खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण आवले आणि महेंद्र काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. तायक्वांदोमधील ब्लॅक बेल्ट ही अखेरची परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होणारा खेळाडू पुढे प्रशिक्षक म्हणून काम करू शकतो. यावर्षी औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे ब्लॅक बेल्टची परीक्षा आयोजित केली होती. डॉ. सुनील कोतकुंडे व डॉ. ऋतिका कोतकुंडे यांची कन्या सई कोतकुंडे आणि शहरातीलच आदिती पवार या दोघा खेळाडूंनी औरंगाबाद सेंटरवरती परीक्षा दिली. यामध्ये सई आणि आदितीने चांगले यश मिळवले आहे. मेहनत घेत त्यांनी या यशाला घवसणी घातली आहे. या दोघींचेही विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com