दापोलीत निवडणार दापोली प्रिन्सेस,दापोली क्वीन

दापोलीत निवडणार दापोली प्रिन्सेस,दापोली क्वीन

पान २ साठी)

दापोलीत निवडणार
दापोली प्रिन्सेस, क्वीन
१० जूनला ब्यूटी स्पर्धा; तरुणी, गृहिणींना व्यासपीठ
दाभोळ, ता. ७ ः दापोली रोटरी क्लब आणि दापोली अर्बन बँकेच्या संयुक्त विद्यमाने दापोली ब्युटी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० जूनला सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात होणार आहे. रोटरी क्लब दापोली मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. महिला सबलीकरण हासुद्धा रोटरीचा जागतिक स्तरावर राबवला जाणारा एक उपक्रम आहे. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना आणि गृहिणींना त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचे एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
ही स्पर्धा अविवाहित मुलींसाठी Dapoli Princess व विवाहित महिलांसाठी Dapoli Queen अशा दोन विभागात घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठीची किमान वयोमर्यादा १८ वर्षे (पूर्ण) आहे. ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येईल. प्राथमिक फेरी शुक्रवार (ता. ९) जूनला दापोली अर्बन सीनिअर सायन्स कॉलेज सभागृहात सायंकाळी ५ ते ९ या वेळेत घेण्यात येईल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांमधून अंतिम फेरीसाठी प्रत्येक गटातून १० स्पर्धकांची निवड करण्यात येईल. दोन्ही गटातील विजेत्या व दोन उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे रु. ७ हजार ७, रु. ५ हजार ५ आणि रु. ३ हजार ३ रोख, मुकूट, गिफ्ट व्हाऊचर अशी भरघोस बक्षिसे मराठी टीव्ही क्षेत्रातील ख्यातनाम तरुण गायिका अक्षता सावंत यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांना सहभाग प्रशस्तिपत्र आणि ईशाना टेक्नॉलॉजिज यांच्याकडून डिजिटल सहेली या संगणक कार्यशाळेचा मोफत लाभ देण्यात येणार आहे.
दापोलीतील महिलांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा व आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडून ही स्पर्धा रंगतदार करावी, असे आवाहन रोटरी क्लब दापोलीचे अध्यक्ष संदीप खोचरे व सचिव प्रदीप साळवी यांनी केले आहे तसेच दापोलीतील सर्व महिलांनी या आगळ्यावेगळ्या अभिनव स्पर्धेला उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब दापोलीतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com