रत्नागिरी- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन
रत्नागिरी- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन

रत्नागिरी- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन

sakal_logo
By

rat७p२६.jpg- KOP२३M०७८१२ रत्नागिरी ः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील आयोजित विविध स्पर्धांमधील विजेते. सोबत मान्यवर.

अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
समूह नृत्य, गाणी, नाटक; क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साही वातावरण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जी कोअर रागा हे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यात सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. स्वा. सावरकर नाट्यगृहात संमेलन रंगले. यात समूह नृत्य, मधूर गाणी, नाटके यांचा समावेश होता. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांमध्ये विशेषतः स्त्रीभ्रूणहत्या या समस्येवर प्रबोधन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एन. खंते होते. महावितरण कोकण झोन अधिकारी मोरे व उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे उपस्थित होते. मुरकुटे यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या संधी व त्या परीक्षेत कसे सामोर जायचे याच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगबाबत सखोल मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. एस. व्ही. पाटील, प्रा. आर. व्ही. मांटे यांनी मार्गदर्शन केले.
स्टेट बँकेचे व्यवस्थापक जांभुळकर त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले. सहसमन्वयक प्रा. एस. आर. शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहसंमेलन सचिव आदित्य शिंदे, जिमखान्याचे सरचिटणीस ओम साळवी, सहसचिव सुमेध गायकवाड, स्नेहसंमेलन सहसचिव मैथिल्य पटले, सांस्कृतिक सचिव ऋषी पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

चौकट १
क्रीडा स्पर्धांचा निकाल
क्रिकेटमध्ये मेकाट्रॉनिक्स विभागातील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात चित्तथरारक विजय मिळवला. मुलींमध्ये द्वितीय वर्षातील विद्युत अभियांत्रिकी विभागातील मुलींनी बाजी मारली. रस्सीखेचमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक, मुलींमध्येही स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनींनी बाजी मारली. बुद्धिबळात देवाशिष पोरे व सांघिक सामन्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स हा गट विजयी झाला. कॅरममध्ये तनय चव्हाण एकेरी सामन्यात तर सांघिक सामन्यात फूड टेक्नॉलॉजी हा संघ विजयी झाला. क्रिकेट व रस्सीखेचचे आयोजन प्रा. पी. आर. जाधव व विद्यार्थी जिमखाना समन्वयक विनायक जाधव व दुर्गेश तेरेदेसाई यांनी केले. बुद्धिबळ, कॅरम खेळाचे नियोजन देवाशिष पोरे, पार्थ आंबेकर यांनी केले.