
मळेवाड आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ज्ञ द्या
०७९९७
मळेवाड आरोग्य केंद्रात
प्रयोगशाळा तज्ज्ञ द्या
हेमंत मराठे; आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मळेवाड, ता. ७ ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने प्रयोगशाळा तज्ज्ञ पद भरा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले कित्येक दिवस प्रयोगशाळा तज्ज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपले रक्ताचे नमुने व अन्य नमुने तपासणीसाठी इतर ठिकाणी खासगी प्रयोगशाळांमध्ये जावे लागत आहे. काही वेळा महालॅबकडे पाठवलेले रक्त नमुने त्याचबरोबर इतर नमुन्यांचा रिपोर्ट येण्यासाठी विलंब लागल्याने रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठीही वेळ जात आहे. यामुळे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तज्ज्ञ हे पद तत्काळ भरा, अशी मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा मळेवाड कोंडुरे उपसरपंच मराठे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. तसेच इतर रिक्त पदेही तत्काळ भरावीत, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांच्याकडे मराठे यांनी केली आहे.