संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

- raदt७p२७.jpg- KOP२३M०७८१३ रत्नागिरी ः पोंभुर्ले येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक सुशोभीकरणासाठी निधीचा धनादेश ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांच्याकडे देताना पालकमंत्री उदय सामंत. सोबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार. (छायाचित्र ः तन्मय दात्ये)

आचार्य बाळशास्त्री जांभेकर
स्मारक विस्तारीकरणासाठी पाच लाख
रत्नागिरी ः मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी ५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. पत्रकार कल्याण निधीच्यावतीने अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी मागणी केल्यानुसार ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी या निधीकरिता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला. याकरिता लिमये यांनी एकदा पालकमंत्री सामंत यांची भेट घेतली. त्या वेळी तत्काळ निधीची उपलब्धता करून देतो, असे त्यांनी आश्वासित केले. त्यानुसार जनता दरबार कार्यक्रमावेळी या निधीचा धनादेश पालकमंत्री सामंत यांनी राजाभाऊंकडे सुपूर्द केला. पोंभुर्ले (ता. देवगड, सिंधुदुर्ग) येथील दर्पण स्मारक आहे. या प्रकल्पाच्या विस्तारीकरण, सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता निधीची गरज आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) यामधून हा पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे सुशोभीकरणाच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे. हा धनादेश दिल्याबद्दल रवींद्र बेडकीहाळ आणि राजाभाऊ लिमये यांनी पालकमंत्री उदय सामंत व प्रशासनाचे आभार मानले.

---------
डीएड् प्रथम बॅचचा स्नेहमेळावा
रत्नागिरी ः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) येथील डीएड् प्रथम बॅच १९९७-९९ विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा निवळीतीली रिसॉर्टमध्ये उत्साहात झाला. विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत, सर्वांची ओळख, एकमेकांची विचारपूस तसेच काही प्रसंग शेअर केले गेले. शाहीर विनायक पडवळ आणि सहकारी यांच्या गीतांचा धमाल मस्ती कार्यक्रम, गप्पाटप्पा उत्साहात पार पडल्या. या वेळी सर्वांनीच २४ वर्षांनी एकत्र भेटल्याचा मनस्वी आनंद व्यक्त केला. १९९७-९९ मध्ये रत्नागिरी एसटी स्टॅण्डसमोर असलेल्या जुन्या इमारतीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी अर्थात् डाएट कॉलेज येथे डीएड् प्रथम बॅचमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही प्राथमिक, माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागले तर काहीजण इतर आवडीच्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. योगेश कदम, संतोष कांबळे आणि विनायक पडवळ यांनी मेळाव्यासाठी प्रयत्न केले. भविष्यात मोठा स्नेहमेळावा व्हायला हवा तसेच एकमेकांना सहकार्य करणे, सामाजिक क्षेत्रातही काम करण्याची भावना प्रत्येकाने व्यक्त करत एकमेकांचा निरोप घेतला.

rat७p३०.jpg ःKOP23M07939 रत्नागिरी ः खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात परिसरात जागतिक पर्यावण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना मान्यवर.

खेड न्यायालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

रत्नागिरी ः खेड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका विधी समिती खेड तथा सामाजिक वनीकरण विभाग खेड यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. या वेळी जिल्हा न्यायाधीश १ तथा तालुका विधी सेवा समिती खेडचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी यांच्या सहकार्याने हा उपक्रम खेड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात झाला. या वेळी न्यायाधीश पी. एस. चांदगुडे, एन. एस. निसळ, एम. व्ही. तोकले, एस. एम. चव्हाण व एम. एम. पाटील यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले तसेच कार्यालयीन अधीक्षक खानोलकर आणि वकील प्रतिनिधी श्रीमती कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी भुवड, सावंत, अंधारे यांनी कार्यालयीन अधीक्षक खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.


लांजा ग्रामीण रुग्णालयात १३ ला
मोफत नेत्र तपासणी शिबिर
लांजा ः ग्रामीण रुग्णालय लांजा येथे मंगळवारी (ता. १३) जूनला सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा शासकीय रुग्णालय आणि समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांची नेत्रतज्ञाद्वारे निःशुल्क तपासणी केली जाईल. शिबिरात मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांची जिल्हा शासकीय रुग्णालयात निःशुल्क शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची राहण्याची, जेवणाची आणि चष्म्याची मोफत सोय केली जाईल. त्यासाठी नेत्ररुग्णांनी शस्त्रक्रियेला येताना मूळ शिधापत्रक व आधारकार्ड तसेच मोबाईल नंबर व आधारकार्ड झेरॉक्स घेऊन यावे, असे आवाहन लांजा ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


एक पाऊल समृद्ध पर्यावरण
उपक्रम लांजा महाविद्यालयात
लांजा ः कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा, आयक्युएसी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक पाऊल समृद्ध पर्यावरणाकडे हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शासनाच्या निर्देशानुसार सिंगल युज प्लास्टिक वापरवर बंदी आहे. ही बाब लक्षात घेता कागदी किंवा कापडी पिशवी वापरणे पर्यावरणाला अनुसरून आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने किमान २५ पेपर बॅग किंवा स्वतः शिवलेल्या कापडी पिशव्या १५ जूनपर्यंत एनएसएस विभागामध्ये जमा करावयाच्या आहेत. खूप छोट्या पेपर बॅग असू नयेत एवढी काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी. जमा केलेल्या कागदी किंवा कापडी पिशव्यांचे वितरण १५ जूननंतर लांजा बाजारपेठेमध्ये केले जाणार आहे. माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्यावतीने महेश सप्रे यांच्याकडून त्यांचे वडील (कै.) हरी शंकर सप्रे यांच्या स्मरणार्थ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना १०० वडाची रोपे वितरित करण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी वडाची निगा राखतील, वडाचे संवर्धन करतील आणि ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा. प्राची बामणे यांच्याकडे द्यायची आहेत.