''शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून''चे सावंतवाडी येथे रविवारी प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून''चे सावंतवाडी येथे रविवारी प्रकाशन
''शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून''चे सावंतवाडी येथे रविवारी प्रकाशन

''शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून''चे सावंतवाडी येथे रविवारी प्रकाशन

sakal_logo
By

swt८३.jpg
08115
स्नेहा कदम
swt८४.jpg
08116
काव्यसंग्रह

‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’चे
सावंतवाडी येथे रविवारी प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ८ः जिल्ह्यातील आघाडीच्या युवा कवयित्री स्नेहा कदम यांच्या ‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’ या प्रथम काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी (ता. ११) सकाळी ११ वाजता येथील कळसुलकर हायस्कूलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या साहित्यिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सम्यक साहित्य संसद परिवार व स्नेहा कदम कुटुंबीयांनी केले आहे.
स्नेहा कदम या प्रसिद्ध कवी विठ्ठल कदम यांच्या कन्या असून बालपणातच त्यांना साहित्य, सामाजिक चळवळीचा वारसा लाभला आहे. शालेय जीवनापासूनच समाजात घडणाऱ्या विविध घटनांचा आढावा त्यांनी आपल्या कवितेतून सादर करून संवेदनशील कवयित्री म्हणून लौकिक प्राप्त केला आहे. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’ हा काव्यसंग्रह हैकर्स पब्लिकेशन (मुंबई) यांनी प्रकाशित केला आहे. काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते सम्यक साहित्य संसदेचे अध्यक्ष सुनील हेतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रा. डॉ. शरयू आसोलकर, प्रा. सीमा हडकर, राजेश कदम आदी मान्यवर काव्यसंग्रहावर चर्चा करणार असून ज्येष्ठ लेखक व कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांना विशेष निमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक तथा सम्यक साहित्य संसदेचे सचिव प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी केले आहे.