
संक्षिप्त
संगमेश्वर रेल्वेस्टेशनवर
लागला तो बोर्ड
संगमेश्वर ः निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने सूचना केल्यानंतर संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशन येथील आरक्षण केंद्र संगमेश्वर पोस्ट ऑफिस स्थलांतरित केल्याचा बोर्ड कोकण रेल्वे व्यवस्थापनाने संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशनध्ये लावला आहे. कोविडनंतर संगमेश्वर रेल्वेस्टेशन येथील आरक्षण केंद्र बंद करून ते संगमेश्वर पोस्ट ऑफिस येथे स्थलांतरित केले गेले होते; परंतु त्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती रेल्वे प्रवाशांना नसल्याने आरक्षणासाठी प्रवाशांना रेल्वेस्टेशनवर येऊन विचारणा करावी लागत होती. तेथून पुन्हा ३ किलोमीटरवर असलेल्या आरक्षण केंद्रावर जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप व आर्थिक भूर्दंड पडत होता. ही गोष्ट लक्षात येताच निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपने रेल्वे प्रशासनास पत्रव्यवहार करून आरक्षण केंद्राविषयी बोर्ड लावण्याची सूचना केली होती. त्याप्रमाणे आता रेल्वेस्टेशनमध्ये बोर्ड लावण्यात आला आहे, असे संदेश जिमन यांनी सांगितले.
भजनीबुवांचा
शनिवारी मेळावा
रत्नागिरी ः जिल्ह्यातील भजनीबुवांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच पारंपरिक भजनीकलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने येथील श्रीराम मंदिरात शनिवारी (ता. १०) सायंकाळी ४ वा. भजनीबुवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाचे प्रमुख संयोजक सुरेश विष्णू तथा अण्णा लिमये आणि सचिव सुरेंद्र घुडे यांनी ग्रामीण व शहरी भागातील भजनीबुवांना या मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या समस्या अनुभव आणि सूचना मांडण्याचे आवाहन केले आहे. जास्तीत जास्त भजनीबुवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
व्हावेतर्फे खेडमधये शिवसेनेची बैठक
चिपळूण ः शाखाप्रमुख हा शिवसेना संघटनेचा पाया आहे, याचा विसर पडू देऊ नका. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन द्या, संघटना बळकट होण्यास वेळ लागणार नाही. त्यांना विश्वासात घेऊन निवडणुका लढवल्यास विजय हमखास आहे. बाळासाहेबांच्या विचाराने घडलेला शिवसैनिक पंधरागाव धामणंद विभागात क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन व्हावेतर्फे खेड येथील शिवसैनिकांच्या बैठकीला संबोधित करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. पंधरागाव धामणंद विभागाच्या शाखाप्रमुख, सरपंच व शिवसैनिकांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून चव्हाण बोलत होते. या वेळी तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, सुरज रेवणे, मनोहर सकपाळ, योगेश आंब्रे, विष्णुपंत कदम, महापदी आदी उपस्थित होते. सखाराम पालांडे यांची विभागप्रमुख व प्रवीण सावंत यांची उपविभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली व त्यांचा सत्कार करण्यात आला.