
रत्नागिरी ः स्वतंत्र पदाची निर्मिती करून किमान वेतन द्या
- rat८p१.jpg-२३M०८०९९
रत्नागिरी ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना निवेदन सादर करताना संगणक परिचालक.
स्वतंत्र पदाची निर्मिती करून किमान वेतन द्या
संगणक परिचालक संघटना; कोरोना काळातही केले काम
रत्नागिरी, ता. ८ ः ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात सर्वच ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक, डाटा एंट्री ऑपरेटर या स्वतंत्र पदाची निर्मिती करून किमान वेतन देण्याची व सध्या कार्यरत असलेल्या सर्व संगणक परिचालकांना या पदावर सामावून घेण्याची शासनास शिफारस करून न्याय द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. गेली ११ वर्षे संग्राम व आपले सरकार सेवाकेंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून नागरिकांना ऑनलाईन, ऑफलाईन सेवा देण्याचे काम संगणक परिचालक करत आहेत. रत्नागिरी जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष हरिश वेदरे, आसिफ नाकाडे, शिवराज भुवड, सीमा शेवडे, गायत्री साळवी, चंद्रकांत लिंगायत उपस्थित होते.
चौकट
ऑनलाईन दाखल्यांचे प्रमाण वाढतेय
ग्रामपंचायतीमध्ये बसून संगणक परिचालक सेवा बजावत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक असून, ग्रामविकास विभागाने स्थापन केलेल्या यावलकर समितीने २०१८ मध्ये सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात पटनिर्मिती करण्याची शिफारस केली आहे. त्यात ग्रामपंचायत स्तरावर माहिती तंत्रज्ञानाचा वाढता वापर पाहता शासनाच्या सर्व योजना नागरिकांना ऑनलाईन दाखले देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर, संगणक परिचालक या पदाची कायमस्वरूपी निर्मिती करून किमान वेतन देणे आवश्यक आहे.