तन्वी गवसांना ''आदर्श ग्रामसेविका'' सन्मान

तन्वी गवसांना ''आदर्श ग्रामसेविका'' सन्मान

८१४९

तन्वी गवसांना ‘आदर्श ग्रामसेविका’ सन्मान
निगुडेवासीयांतर्फे सत्कार ः उल्लेखनीय प्रशासकीय सेवेची दखल
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ ः निगुडे येथील ग्रामसेविका तन्वी गवस यांची आठ वर्षांच्या सेवेनंतर प्रशासकीय बदली झाली. त्यानिमित्ताने निगुडे गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला यांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी आठ वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आदर्श ग्रामसेविका पुरस्काराने सन्मानित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर होते. माजी सरपंच समीर गावडे यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन निगुडे गावचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी केले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना गवस यांच्या कार्याचा गौरव केला. शेर्ले गावचे माजी सरपंच उदय धुरी यांनी त्यांच्या कार्याविषय़ी गौरवोद्गार काढले. माजी ग्रामपंचायत सदस्य विठू गवंडे यांनी निगुडे गावाप्रमाणे अन्य ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उभारी येवो, अशी भावना व्यक्त केल्या. माजी सरपंच आत्माराम गावडे यांनी गवस यांच्या सामाजिक ऋणानुबंधांचा आवर्जून उल्लेख केला. सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव यांनी त्यांच्या प्रशासकीय कामाचे कौतुक केले. तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे यांनी आदर्श ग्रामसेविका असा उल्लेख केला. माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, निगुडे सरपंच निगुडकर, माजी उपसरपंच गवंडे आदींसह माजी मुख्याध्यापक महादेव नाईक, तलाठी भाग्यश्रीला शिंदे, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी गवस यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. गवस यांनी सत्काराला उत्तर देताना निगुडे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अन्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी निगुडे गावातील गौरव प्राप्त दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मडुरा हायस्कूलमध्ये निगुडे गावातून दहावीत द्वितीय क्रमांक आलेली विनिता नाईक हिचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तन्वी गवस यांचाही गावाच्यावतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. गुरुदास गवंडे यांनी आभार मानले. यावेळी निगुडे उपसरपंच गौतम जाधव, रोणापाल सरपंच योगिता केणी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com