रत्नागिरी ः उद्योजक फेडरेशनचे पुरस्कार जाहीर

रत्नागिरी ः उद्योजक फेडरेशनचे पुरस्कार जाहीर

पद्मश्री डॉ. के. एच. घरडा यांना
रत्नागिरी चेंबर्सचा जीवनगौरव पुरस्कार

सीएसआर पुरस्कार विनंती ऑरगॅनिकला जाहीर
चिपळूण, ता. ८ ः रत्नागिरी फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज या उद्योजकांनी स्थापन केलेल्या जिल्हा फेडरेशनच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारापैकी जीवनगौरव पुरस्कार नामवंत शास्त्रज्ञ उद्योजक पद्मश्री डॉक्टर के. एच. घरडा यांना देण्यात येणार आहे तर सीएसआर पुरस्कार विनंती ऑरगॅनिक लिमिटेड या कंपनीला देण्यात येत आहे.
जिल्हा उद्योजकता पुरस्कारासाठी अभिषेक एन्टरप्रायजेस गुहागर, फायरटेक इक्विपमेंट सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड, क्वालिटी बेकर्स चिपळूण, एम. के. इंजिनियर्स अँड एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरी, प्रांजल पॉलिमर दापोली, साखरकर बेकरी राजापूर, विजय स्वप्न इन्फोटेक चिपळूण यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू सावंत यांनी दिली.
या पुरस्काराची घोषणा दोन महिन्यांपूर्वी फेडरेशनच्यावतीने करण्यात आली होती. उत्पादकता रोजगार निर्मिती एक्स्पोर्ट सामाजिक जबाबदारी अशा विविध गोष्टींची पडताळणी करून तज्ञ समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे. अतिशय पारदर्शकपणे योग्य उद्योजकांचा सन्मान होईल याची काळजी घेऊन तज्ञ समितीने प्राप्त झालेल्या अर्जातून या पुरस्कारांची निवड करून त्यांना सन्मानित करण्याचे निश्चित केले आहे, असे सावंत म्हणाले. रविवारी (ता. ११) श्रद्धा साफल्य मंगल कार्यालयात आयोजित करणाऱ्या आलेल्या रत्नागिरी जिल्हा उद्योजकता विकास परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या परिषदेमध्ये माजी केंद्रीय रेल्वे आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com