अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारसाठी पुरवणी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारसाठी पुरवणी परीक्षा
अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारसाठी पुरवणी परीक्षा

अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारसाठी पुरवणी परीक्षा

sakal_logo
By

१२ (पान २ साठी)

अनुत्तीर्ण, श्रेणीसुधारसाठी पुरवणी परीक्षा

रत्नागिरी, ता. ९ ः दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्‍या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्‍या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार १८ जुलै ते ५ ऑगस्टमध्ये या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणार आहे. दहावी-बारावीच्या पुरवणी लेखी परीक्षा १८ जुलैला सुरू होणार आहेत. बारावीची सर्वसाधारण व द्विलक्षी विषयांची परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत तर व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत घेतली जाणार आहे. तसेच बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १८ जुलै ते ५ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षाही १८ जुलैपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. दरम्यान, पुरवणी परीक्षेचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापिल स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापिल वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट होण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.
---

श्रेणी सुधारण्यासाठी संधी

नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट २०२३ व फेब्रुवारी-मार्च २०२४ अशा लगतच्या दोनच संधी मिळणार आहेत.