
फोटोसंक्षिप्त-खासदार राऊत आज जिल्ह्यात
फोटोसंक्षिप्त
८३८०
खासदार राऊत
आज जिल्ह्यात
कुडाळ ः खासदार विनायक राऊत जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक असणार आहेत. खासदार राऊत यांचा दौरा कार्यक्रम असा ः सकाळी १०.३० वाजता मालवण शहर शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी बैठक, दुपारी १.३० वाजता आंबेरी गावभेट, दुपारी २ वाजता धामापूर गावभेट, दुपारी २.३० वाजता काळसे गावभेट, दुपारी ३ वाजता पेंडूर गावभेट, सायंकाळी ४.३० वाजता ओरोस येथे ठाकरे शिवसेना प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थिती.
ओरोस शाळेचे
नेत्रदीपक यश
कुडाळ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नं. १ प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत यश संपादन केले. दुसरीचा विद्यार्थी स्वरूप कुमठेकर याने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक व एसटीएस परीक्षेत सुवर्णपदक प्राप्त केले. तिसरीचा विद्यार्थी हर्षद गराटे याने मंथन परीक्षेत केंद्रात दुसरा क्रमांक प्राप्त केला. सातवीची विद्यार्थिनी सांची पाटयेकर हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षते प्रथम क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे केंद्रप्रमुख संजय कदम, मुख्याध्यापिका श्रुती मुंडले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश आरोसकर, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, माता, पालक, शिक्षक, पालक संघ उपाध्यक्ष व सदस्य, पालकांनी अभिनंदन केले.