चिपळूण ः पुण्यातील आरोपी बहादूरशेख नाका येथे जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पुण्यातील आरोपी बहादूरशेख नाका येथे जेरबंद
चिपळूण ः पुण्यातील आरोपी बहादूरशेख नाका येथे जेरबंद

चिपळूण ः पुण्यातील आरोपी बहादूरशेख नाका येथे जेरबंद

sakal_logo
By

पुण्यातील आरोपी
बहादूरशेख नाका येथे जेरबंद
मोक्काअंतर्गत गुन्हा ; सिंहगड पोलिसांची कारवाई
चिपळूण, ता. ९ः खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे सिंहगड येथे मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असलेला सूरज संतोष ढवळे (१९) हिंगणे पुणे याला सिंहगड पोलिसांनी बहादूरशेख नाका, चिपळूण येथून बुधवारी अटक केली आहे.
या कामी चिपळूण पोलिसांनीदेखील महत्वाची भूमिका बजावली. सूरज ढवळे 8 महिने फरार होता. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकर्णी सूरज संतोष ढवळे व त्याच्या इतर साथीदारावर पुणे सिंहगड पोलिस ठाण्यात मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. ढवळेच्या साथीदारांना सिंहगड पोलिसांनी अटक केली होती; मात्र सूरज हा फरार झाला होता. सिंहगड पोलिसांना सूरज चिपळूण येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खात्री केल्यानंतर पोलिस निरीक्षक सचिन निकम यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. निरीक्षक सचिन निकम पोलिसांचे एक पथक घेऊन चिपळूणमध्ये दाखल झाले. येथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांनी संशयिताला जेरबंद करण्यासाठी व्यवस्थित सापळा रचला आणि सूरज ढवळे याला अखेर 8 महिन्यानंतर चिपळूणमधून अटक केली.

पोलिस उपायुक्त सोहेल शर्मा, सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजूरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, सहाय्यक उपनिरीक्षक आबा उतेकर, पोलिस अंमलदार संजय शिंदे, विकास पांडुळे, विकास बांदल, देव चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, अमित बोडरे, अविनाश कोंडे या पथकाने ही कारवाई केली.

---------------------------