हुंबरट भोरपीवाडा शाळा भरली लगतच्या घरात

हुंबरट भोरपीवाडा शाळा भरली लगतच्या घरात
Published on

09696
हुंबरट : येथील भोरपीवाडी शाळेची छप्पर दुरूस्ती रखडल्‍याने शाळा लगतच्या घरात भरवावी लागत आहे.


हुंबरट भोरपीवाडा शाळा भरली लगतच्या घरात

डागडुजीचा प्रश्न; निधी मंजूर असूनही काम रखडले

कणकवली, ता. १६ : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे गुरुवारी (ता.१५) शाळांमध्ये वाजतगाजत स्वागत झाले; पण तालुक्‍यातील हुंबरट भोरपीवाडीतील मुलांना मात्र शाळेऐवजी लगतच्या घरातील व्हराड्यांत बसून अध्यापन करावे लागले. दरम्‍यान, इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर असून दोन दिवसांत छप्पर दुरुस्तीची कार्यवाही पूर्ण होईल, अशी ग्‍वाही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
हुंबरट भोरपीवाडी शाळेचे छप्पर मोडकळीस आले होते. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळेचे छप्पर दुरूस्त होईल, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना होती; मात्र शाळेचा पहिला दिवस उजडला तरीही छप्पर दुरूस्ती झाली नव्हती. त्‍यामुळे या शाळेपासून काही अंतरावर असलेल्‍या सुरेश होळकर यांच्या घरात शाळेतील सर्व मुलांना बसविण्यात आले. या शाळेत १६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा इमारत दुरुस्ती रखडल्‍याने या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दरम्‍यान, या शाळेच्या दुरुस्तीचे काम मंजूर आहे. पुढील दोन दिवसांत या शाळेची दुरुस्ती पूर्ण होईल. त्‍यानंतर सोमवार (ता. १९) पासून या शाळेचे वर्ग शाळा इमारतीमध्ये सुरू होतील, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी दिली. तर ठेकेदाराने शनिवार आणि रविवारी या दोन दिवसांत शाळा दुरूस्तीची कार्यवाही पूर्ण करण्याची ग्‍वाही दिल्‍याची माहिती या शाळेतील शिक्षकांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com