कलाध्यास घडवे उद्योजकास

कलाध्यास घडवे उद्योजकास

१२ (टुडे पान १ साठी)

(३ ऑगस्ट टुडे ३)

धरू कास उद्योजकतेची.........लोगो


-rat५p१८.jpg ः
P२३M२८२३२
प्रसाद जोग
---------

कलाध्यास घडवे उद्योजकास...

उद्योजकता हे एक मोठे विश्व आहे. या विश्वात पदार्पण करण्यासाठी अंगी धैर्य आणि ध्यास असावा लागतो तसेच हातात कला असावी लागते. कलाशिक्षण घेऊन आज कोकणातील बरेच तरुण, तरुणी स्वतःचा कलाक्षेत्रातील उद्योग सुरू करण्याचे वेगळे धाडस करत आहेत व हे अभिनंदनीय देखील आहे.

-प्रसाद जोग
-----------

प्रयत्नपूर्वक कलाकृती घडवताना कलाकारांना कलाध्यासच कामी येत असतो. नवनिर्मिती हे कोणत्याही कलेचे फलित असते. या नवनिर्मितीतूनच कलाकाराचा आत्मविश्वास व व्यासंग वाढत असतो. कलाकार मूलतः स्वतंत्र विचारसरणीचा असल्याने त्याचा कल नेहमी निर्मितीकडे व सृजनत्वाकडेच जास्त दिसून येतो. निर्मिती करताना कलाकारांची कलाकौशल्ये पणास लागतात. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ''Every Creation is depending upon Passion and Obsession.'' आणि हे तितकेच वास्तवदर्शीही आहे.
कलेचा उत्कृट ध्यास घेतलेल्या आपल्या मातीतल्या उद्यमी कलाकारांना त्यांच्या उद्योजकीय करिअरसाठी एकाहून एक सरस अशा नवनवीन संधी आता प्राप्त होत आहेत. स्वत:च्या समोर आलेला संधींचा कॅन्व्हास कसा क्रिएटिव्ह करायचा, हे आपल्या कलाकारांना चांगलेच ठाऊक झाले आहे. काळाप्रमाणे बदलत जाणाऱ्या गरजांचा शोध घेऊन आपले अभिनव कला स्वराज्य उभारण्याचे काम हे तरुण कसोशीने करत आहेत. काहीतरी वेगळं पण स्वतःला व इतरांना नवनिर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळवून देणारा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकडे युवावर्गाचा कल दिसून येत आहे. येणाऱ्या काळात कोकणात कला उद्योजक स्वतःचे वेगळे स्थान चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, या कला प्रकारातून जागतिक पातळीवरही निश्चितपणे दाखवून देतील. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस हे भारतातील सर्वात महत्वाचे आर्ट कॉलेज आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा प्रख्यात आहे. यामधून शिकलेले असंख्य कलाकार उद्योजक आपल्या भारताचे नाव उज्ज्वल करत आहेत तसेच कोकणातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेचे आर्ट कॉलेज व देवरूख येथील कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन म्हणजेच डी-कॅड ही महाविद्यालये कोकणातही चांगले चित्रकार, कलाकार, कलाशिक्षक, शिल्पकार, मूर्तिकार घडवत आहेत.
देशातील नामवंत जहांगीर कलादालनात (आर्ट गॅलरीमध्ये) आपले चित्र प्रदर्शनात लागावे, असा कलाकार म्हणून सर्व कला विद्यार्थ्यांचा ध्यास असतो. यावर्षीच्या ४३व्या मान्सून शोमध्ये कोकणातील सह्याद्री स्कूल ऑफ सावर्डे या चित्र शिल्पकला महाविद्यालयातील इशा राजेशिर्के, प्राची जोगळेकर, राज वरेकर व करण आदवडे यांनी पाठवलेल्या चित्रांची निवड झाली होती. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. कोकणातील कलाध्यास घेतलेल्या गुणी कलाकारांना सह्याद्री आर्ट कॉलेजचे ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार प्रकाश शिर्के व महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सर यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभत आहे. डी-कॅड कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे यांनीही स्वच्छ सुंदर देवरूखसाठी बोलक्या भिंती करण्याची मांडलेली संकल्पना सृजनशील व अभिनव अशीच आहे. कला महाविद्यालयातून शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वतःच्या स्वतंत्रशैलीत काम करण्यावर भर देत असल्याने त्यांना त्यांची वैयक्तिक ओळख साकार करता येत आहे व प्राप्त केलेल्या शिक्षणातून आपली व्यावसायिक उन्नती साध्य करून घेता येत आहे.
आजच्या लेखात आपण सह्याद्री आर्ट कॉलेजमधून जीडी आर्ट पेंटिंग जीडी आर्टस् स्कल्प्चर हे शिक्षण घेतलेल्या होतकरू तरुणांनी चिपळूण येथे सुरू केलेल्या स्टार्टअपची माहिती घेणार आहोत. कौस्तुभ चव्हाण या तरुणाने स्वतःला असलेली चित्रकलेची आवड जोपासत क्रिएटिव्ह कॅन्व्हास हे चिपळूणमधील फक्त कलासाहित्य विक्रीचे पहिले दालन सुरू केले असून, हे फक्त विक्रीचे दुकान नसून यामध्ये कलाप्रेमींना, कलाकारांना आवश्यक असणाऱ्या कला साहित्यप्रकारांची ओळख करून दिली जाते व त्याचे महत्वही पटवून दिले जाते. जीडी आर्ट पेंटिंग पूर्ण केलेला हा तरुण स्केचिंग, डिजिटल पोट्रेट मेकिंग आणि पेंटिंग प्रदर्शन व विक्री अशी कामे मोठ्या धाडसाने करतो.
कलाप्रेमी कलाकारांच्या कॅन्व्हासवर चांगले चित्र चितारले जावे म्हणून मुंबई-पुण्यामध्येच फक्त उपलब्ध असणारे दर्जेदार कला साहित्य स्वतःच्या क्रिएटिव्ह कॅन्व्हास या इंटरप्राइजमधून उपलब्ध करून देतो आहे. ऑइल कलर, अॅक्रिलिक कलर, वॉटरकलर, पोस्टर कलर, फॅब्रिक कलर, विविध प्रकारचे पेपर्स, स्प्रे, कार्व्हिंग टुल्स, ब्रशेस, कॅन्व्हास व कॅन्व्हास बोर्ड त्याने विक्रीला ठेवले आहेत. क्रिएटिव्ह पेंटिंगच्या कमर्शियल असाइनमेंट कौस्तुभ आपल्या क्रिएटिव्ह कॅन्व्हासद्वारे पूर्ण करून देतो.
चिपळूणमधील प्रसिद्ध त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा आपल्या वडिलांबरोबर नावारूपाला आणणारा दुसरा तरुण उद्योजक म्हणजे सौरभ महाजन. शंकरवाडी मुरादपूर येथील सौरभ त्रिमूर्ती शिल्पकला स्टुडिओ, त्रिमूर्ती गणेश चित्रशाळा व त्रिमूर्ती गणेश रंगभांडार असे उद्योग मोठ्या आवडीने व उत्कटतेने सांभाळतो. चिपळूणला आलेल्या महापुरातूनही स्वतःवर असलेल्या विश्वासातून व कलाध्यासातून त्याने हिमतीने पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेतलेली आहे.
*कलाक्षेत्रात भविष्यात उपलब्ध संधी -
कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची आर्ट गॅलरी उभारणे. जुन्या शिल्पांचे, चित्रांचे जतन करून त्याचे खासगी म्युझियम उभारणे. विविध उद्योगांसाठी कॅलिग्राफी केलेले प्रमोशनल प्रिंटिंग मटेरियल तयार करून देणे. व्यंगचित्र, कार्टुन्स यांची थ्रीडी प्रिंट तयार करून लहान मुलांसाठी खेळणी बनवणे. सोशल मीडियावर जसे अवतार असतात तसे पर्सनलाईज कॅरी केचर्स बनवून देणे. विविध चित्रांची लायब्ररी सुरू करून दर आठवड्याला चित्र बदलून देण्याची व्यवस्था करणे. कोकणात आर्ट स्टुडिओ विकसित करणे, स्वत:ची advertising अँड ब्रॅण्डिंग एजन्सी सुरू करणे, चित्रकलेचं, शिल्पकलेचं महत्व समजावून सांगणारे यू ट्यूब चॅनल सुरू करणे, आर्टस् क्लासेस, हॉबी क्लासेस सुरू करणे.

(लेखक उद्योग प्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
--

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com