आठ लाखांची दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठ लाखांची दारु जप्त
आठ लाखांची दारु जप्त

आठ लाखांची दारु जप्त

sakal_logo
By

29195
सावंतवाडी ः दारू वाहतूक करताना पकडलेल्या दोघा संशियत व मुद्देमालासमवेत जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक.


आठ लाखांची दारु जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई; कणकवलीतील दोघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ८ ः महागड्या अलिशान मोटारीमधून अवैधरित्या गोवा बनावटीची दारु वाहतूक करण्याऱ्या दोघांना जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. चेतक भरत वाळवे (वय २७ रा. तिवरे-वाळवेवाडी, ता. कणकवली) आणि महेश्वर हनुमंत मोरे (वय ३७ रा. कलमठ-मोरेश्वरनगर, ता. कणकवली) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून ८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीच्या दारुसह ३८ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी पोलिस ठाणे हद्दीत करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करुन अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार आज पहाटे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचला होता. दरम्यान पहाटे ४.३० च्या सुमारास दोन आलिशान मोटारीतून (एमएच ०१/बीसी/ १६१६) व (एमएच ०७/एबी/५३५४) मोटार मुंबईच्या दिशेने येताना दिसल्या. त्या थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारु आढळली. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन दोघा चालकांना अटक करण्यात आली.
----
एकूण ३८ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल
३० लाख रुपये किमतीच्या दोन्ही मोटारींसह एकूण ३८ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सावंतवाडी पोलिस ठाण्याकडून पुढील तपास चालू आहे. पोलिस अधीक्षक अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक बगाटे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संदिप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रकाश कदम, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, पोलिस नाईक, चंद्रकांत पालकर, चंद्रहास नार्वेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.