चिपळूण : रिगलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण : रिगलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
चिपळूण : रिगलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

चिपळूण : रिगलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

रिगलचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
चिपळूण, ता. १० : रिगल एज्युकेशन सोसायटीचा १६वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
दलवाई हायस्कूलचे मुख्याध्यापक रोहित जाधव व संस्थेच्या संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संचालिका डॉ. सुमिता शिर्के यांच्या हस्ते शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रोहित जाधव यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअर हे करीत असताना एक माणूस म्हणून आपली समाजातील वागणूक कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने विविध विभागांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. फॅशन डिसायनिंग व हॉटेल मॅनेजमेंट या विभागातील विद्यार्थ्यांनी आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला प्रा. वैशाली भोसले, अजिंक्य शिंदे, मोनिका कारंडे आदी उपस्थित होते.