सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आज चिपळुणात
४७ (पान ३ साठी)
सार्वजनिक बांधकाममंत्री
रवींद्र चव्हाण आज चिपळुणात
चिपळूण, ता. ११ ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण मंगळवारी दुपारी चिपळूणमध्ये येत असून, या वेळी ते चिपळूण ते आरवली या पॅकेज ५ मधील महामार्ग चौपदरीकरण कामाची पाहणी करणार आहेत. त्याचबरोबर अरवली ते कांटे या येथील कामाचीदेखील पाहणी करणार आहेत. गणेशोत्सवापूर्वी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.
चौपदरीकरणाची एक मार्गिका तरी डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्या अनुषंगाने बांधकाममंत्री चव्हाण यांनी या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. सकाळी पनवेल येथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. पळस्पे ते इंदापूर येथून कामाची पाहणी करण्यास ते सुरवात करणार आहेत. कशेडी बोगदा तसेच परशुराम घाट येथे कामाची पाहणी केल्यानंतर दुपारी चव्हाण चिपळुणात दाखल होणार आहेत. येथे अधिकाऱ्यांशी चर्चा करून चिपळूण ते आरवली या २५ किलोमीटरच्या कामाची पाहणी करणार आहेत.