तालूकास्तरीय खो-खो स्पर्धेत 82 संघ सहभागी
१३ (टूडे ३ साठी)
-rat१२p४.jpg ः
२३M३००४५
सावर्डे ः एसव्हीजेसिटी क्रीडा संकुलातील इनडोअर खो-खोच्या मैदानावर सुरू असलेले सामने.
----------
जनता विद्यालयाला दुहेरी विजेतेपद
तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा; ८२ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १२ ः डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलात चिपळूण तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षांखालील मुलांमध्ये १४ संघ आणि मुलींमध्ये ९ संघ, १७ वर्षांखालील मुलांमध्ये २९ संघ आणि १७ वर्षांखालील मुलींमध्ये एकूण ८ संघ तसेच १९ वर्षांखालील मुलांमध्ये १९ संघ आणि १९ वर्षांखालील मुलींमध्ये एकूण ३ संघ अशा एकूण ८२ संघांनी सहभाग घेतला. सर्व संघांचे मिळून ९८४ खेळाडू स्पर्धेला उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष राकेश खांडेकर, चिपळूण तालुका स्पर्धा समन्वयक समीर कालेकर, क्रीडाशिक्षक उल्हास मोहिते, एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलाचे क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांमध्ये जनता माध्यमिक विद्यालय, कोकरे संघाने अंतिम सामन्यात शिर्के माध्यमिक विद्यालय भोम यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले. न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी, सती संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १४ वर्षाखालील मुलींमध्ये जनता माध्यमिक विद्यालय, कोकरे संघाने अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, वहाळ संघाचा पराभव केला. मेरी माता स्कूल, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, वहाळ आणि दलवाई हायस्कूल मिरजोळे, चिपळूण यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल वहाळ या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. शि. आ. बा. सुर्वे माध्यमिक विद्यालय, निवळी संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री, आबिटगाव आणि गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे, चिपळूण यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल खांडोत्री, आबिटगाव संघ विजयी ठरला. शिर्के माध्यमिक विद्यालय भोम संघ तृतीय क्रमांक मिळाला. १९ वर्षाखालील मुलांमध्ये व. ज. भागवत विद्यालय ज्यु. कॉलेज बोरगाव संघ विजेते पदाचा मानकरी ठरला तर वं. भागवत माध्यमिक विद्यालय ज्यु. कॉलेज मार्गताम्हाणे संघाने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय सावर्डे, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात व. ज. भागवत विद्यालय ज्यु. कॉलेज बोरगाव संघाने गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे, चिपळूण संघावर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. डॉ. ता. चोरगे ज्यु. कॉलेज मांडकी, पालवण संघाने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्या संघांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.