''वॉकथॉन'' उपक्रमास सावंतवाडीत प्रतिसाद
30131
सावंतवाडीः शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून ‘वॉकथॉन’चा प्रारंभ झाला.
‘वॉकथॉन’ उपक्रमास सावंतवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी ः इनरव्हील क्लबने सावंतवाडीत आरोग्य सुदृढतेसाठी ७ ते ७५ वयोगटातील नागरिकांना चालण्याची सवय लागावी, यासाठी उपक्रम राबविला. या उपक्रमाचे कौतुक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. डॉ. श्रीकांत दीक्षित यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुदृढ आरोग्यासाठी सावंतवाडी इनरव्हील क्लबने आयोजित केलेल्या पाच किलोमीटर चालणे ‘वॉकथॉन’ उपक्रमामध्ये ७ ते ७५ वर्षे वयापर्यंतच्या सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते आज सकाळी सहाला झेंडा दाखवून वॉकथॉनची सुरुवात झाली. यावेळी इनरव्हील क्लब अध्यक्ष रिया रेडीज, सचिव डॉ. मीना जोशी, डॉ. नेत्रा सावंत, श्रेया नाईक, शीतल केसरकर, डॉ. करमरकर, दर्शना तळेगावकर, सुमेधा नाईक, देवता, सोनाली, भारती, उल्का, मीनल, संजना, रेखा, अनिता प्रभू आदी उपस्थित होते.