टुडे पान 2 साठी, संक्षिप्त पट्टा

टुडे पान 2 साठी, संक्षिप्त पट्टा

१९ (टूडे २ साठी, संक्षिप्त)


- rat१४p४.jpg -
P२३M३०४८४
देव्हारे ः पाककला स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना शिक्षक, मान्यवर.
----------
पाककला स्पर्धेत सुरेखा बोतरे प्रथम

मंडणगड ः प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेंतर्गत मंडणगड पंचायत समिती महिला बालकल्याण विभागातर्फे देव्हारेत आयोजित केंद्रस्तरीय पाककला स्पर्धेत गोठे शाळेच्या पोषण आहार शिजवणाऱ्या सुरेखा बोतरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेसाठी ज्वारी, गहू, तांदूळमिश्रित शेवग्याच्या पाल्याचे थालिपीठ ही डीश त्यांनी बनवली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रोशनी साखरकर, दीपक पतिंगे, शिल्पा तांबे यांनी काम पाहिले. स्पर्धेचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख बोर्ले, नांदगावकर यांनी मेहनत घेतली.
-------

मानेज् इंटरनॅशनलच्या विद्यार्थिनींचा
आरती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक

रत्नागिरी ः कुवारबाव येथील मानेज् इंटरनॅशनल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेतील विद्यार्थिनींनी टीडब्ल्यूजे असोसिएशन व टीडब्ल्यूजे फाउंडेशन शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच घेण्यात आलेल्या आरती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेची पहिली फेरी ही ऑनलाईन घेण्यात आली होती. मानेज् इंटरनॅशनलच्या विद्यार्थिनींची त्या फेरीमध्ये निवड होऊन त्यांनी अंतिम फेरी गाठली. त्यानंतर झालेल्या अंतिम फेरीमध्ये मानेज् इंटरनॅशनल शाळेच्या आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले. संगीतशिक्षिका सायली मुळ्ये-दामले यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सुमन अरोरा यांनी संगीत शिक्षिका सायली मुळ्ये-दामले व सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. संस्थेच्या कार्याध्यक्षा नेहाजी माने व व्यवस्थापक प्रद्युम्न माने यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
------
----------
-rat१४p२४.jpg-
P२३M३०५५८
चिपळूण ः कापरे-देऊळवाडा विद्यार्थ्यांनी गणपती कारखाना चित्रशाळेस क्षेत्रभेट दिली.
--------
कापरे देऊळवाडा विद्यार्थ्यांची
गणपती चित्रशाळेला क्षेत्र भेट

चिपळूण : तालुक्यातील कापरे येथे गेली ४० वर्षे कार्यरत असणारे गणपती चित्रशाळेला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा देऊळवाडा शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी क्षेत्रभेट दिली. शैक्षणिक क्षेत्रातील निवृत्त केंद्रप्रमुख तथा प्रवचनकार तुकाराम गुरव आणि प्रसिद्ध गणपती कार्यशाळेचे चित्रकार मंगेश बाळू लाखण यांचे कापरे गावात स्वतंत्र गणपती कारखाने आहेत. शाडूमातीची मूर्ती इकोफ्रेंडली पर्यावरणास लाभधारक आहे. गणपती मूर्ती साकारताना प्रत्येक चित्रकाराला आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना ज्येष्ठ चित्रकार तुकाराम गुरव यांनी व्यक्त केली. तरुण हौशी चित्रकार मंगेश लाखण यांनी पारंपरिक व्यवसायाची माहिती देऊन अवघ्या काही मिनिटांत गणपतीचे वाहन उंदीरमामा शाडूमातीपासून प्रात्यक्षिक कृती करून दाखवले. या चित्रशाळेत सहभागी असणारे सर्व विद्यार्थी, विजय गुरव, अजित कळमुंडकर, संतोष बांद्रे, सतीश गायकवाड, सनित बांद्रे, धीरज खेराडे आदींचे उत्तम सहकार्य मिळाले. मुख्याध्यापिका आश्विनी नाखरेकर, पदवीधर शिक्षिका मानसी महाडीक, संतोष तांबे आणि गणेश सुर्वे आदींनी क्षेत्रभेटीचे उत्तम नियोजन केले होते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com