रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

नेहरू युवा केंद्रातर्फे
आज जिल्हास्तरीय स्पर्धा
रत्नागिरी : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा शुक्रवारी (ता. १५)
आणि राज्य स्पर्धा १९ सप्टेंबरला ऑनलाइन पद्धतीने होतील. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे प्राईडनिमित्त देशाच्या संसदेत श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी २५ स्पर्धक निवडले जातील. या निमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन भाषण स्पर्धा आयोजित केल्या आहेत. स्पर्धेचा विषय गांधींचा वैश्विक प्रभाव ः आजच्या दुनियेत गांधीवादी विचारांची प्रासंगिकता हा आहे. भाषा ही इंग्रजी किंवा हिंदी असावी व वेळ जास्तीत जास्त ३ मिनिटे असेल. स्पर्धकांची वयोमर्यादा १८ ते २९ वर्षापर्यंत असावे. राष्ट्रीय स्पर्धा २ ऑक्टोबरला दिल्ली येथे संसदेत ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक स्पर्धक हा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल. राज्यस्तरीय प्रथम क्रमांक स्पर्धकाला राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांसाठी संसदेत आमंत्रित केले जाईल.


संगमेश्वरात रविवारी
रन फॉर स्कीलचे आयोजन
रत्नागिरी : संगमेश्वरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून रविवारी (ता. १७) सकाळी ७ ते ८ वा. या वेळेत रन फॉर स्कील मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करून नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर ५ किमी ठेवण्यात आले आहे. एसटी स्टँड संगमेश्वर ते लोवले ग्रामपंचायत व परत लोवले ग्रामपंचायत ते संगमेश्वर स्टँड असा असेल. महिला व पुरुष यांना स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.
------
मिरवणुकीतील वाहनांची
तपासणी करून घ्यावी
रत्नागिरी : गणेशोत्सव काळात रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने गणेशमूर्ती आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये वापरण्यात येणारी वाहने तपासणी करून घ्यावीत तसेच अपघातमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याकरिता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी केले आहे. गणेशोत्सव कालावधीत गणेशमूर्तींची वाहतूक करणारी वाहने यांना पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन तपासणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे आणि वाहने आपल्या सोईनुसार मौजे हातखंबा येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक, मौजे पिंपळी, (ता. चिपळूण) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी तपासणीसाठी सादर करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.